पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद

Posted On: 23 JAN 2023 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2023

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 24 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या निवासस्थानी 7 एलकेएम  येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी ) पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील.

नवोन्मेष, समाजसेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच  शौर्य या सहा श्रेणींमध्ये उल्लेखनीय  कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करत आहे . प्रत्येक पुरस्कार विजेत्याला  पदक, रोख रु. 1 लाख आणि प्रमाणपत्र दिले जाते.यावर्षी, बाल शक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये देशभरातील 11 मुलांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -2023 साठी निवड झाली आहे.पुरस्कार विजेत्यांमध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893025) Visitor Counter : 175