युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडा मंत्रालयाची पहिली मिशन ऑलिंपिक सेलची (MOC) पहिली बैठक दिल्लीबाहेर आयोजित
Posted On:
22 JAN 2023 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2023
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने (MYAS) 19 आणि 20 जानेवारी रोजी भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आपली पहिली मिशन ऑलिंपिक सेलची(MOC) बैठक, प्रथमच दिल्लीच्या बाहेर घेण्यात आली.
मिशन ऑलिंपिक सेलचे सदस्य भारताच्या ऑलिम्पिक कार्यक्रमाच्या मुख्य मुद्द्यांवर आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) मधील खेळाडूंच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी, भेटतात, ही पाक्षिक बैठक यावेळी भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित करण्यात आली होती जिथे त्यांना भारतीय पुरुष हॉकी संघाचा वेल्स संघाविरुद्ध शेवटच्या गटातील सामना देखील पहावयास मिळाला.
खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पहाण्याच्या या अनुभवाबद्दल बोलताना, माजी भारतीय लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज म्हणाली, "या संधीमुळे (विश्वचषक सामना प्रत्यक्ष पाहण्याच्या) आम्हाला त्यांना स्पर्धेत खेळत असताना पाहण्याची उत्तम संधी मिळाली त्यामुळे त्यांचे अधिक चांगल्या पद्धतीने मूल्यमापन करून त्यांना योग्य न्याय देऊन त्यातील अंतर भरून काढू, आणि पुढील बैठकीत या सर्व बाबींचा विचारविनिमय करणे आम्हाला शक्य होईल.मला शक्य असेल तेव्हा फक्त हॉकीच नव्हे तर इतर खेळांचेही बरेच सामने पाहायला आवडतील,त्यामुळे आम्हाला ही एक उत्तम संधी मिळाली.
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ हेच केवळ असे संघ आहेत, ज्यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) वार्षिक प्रशिक्षण आणि स्पर्धा (ACTC) यासाठी 24 कोटी रुपयांचा निधी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून (MYAS) टॉप्स (TOPS) या योजनेअंतर्गत निधी दिला जातो.
* * *
R.Aghor/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892839)
Visitor Counter : 212