कोळसा मंत्रालय

वर्ष 2023-24 साठी एकूण उत्पादन उद्दीष्टाचा कोळसा मंत्रालयाकडून आढावा

Posted On: 18 JAN 2023 4:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023

कोळसा मंत्रालयाने 2023-24 या वर्षात एक अब्ज टन (बीटी) पेक्षा अधिक कोळसा उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोळसा सचिवांनी सर्व कोळसा कंपन्यांसोबत सखोल आढावा घेतला. सीआयएल ला 780 दशलक्ष टन (एमटी), सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेडसाठी 75 एमटी आणि बंदिस्त आणि व्यावसायिक खाणींसाठी 162 एमटी लक्ष्य निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीआयएल मध्ये एकूण 290 खाणी कार्यरत आहेत, त्यापैकी 97 खाणींमधून वर्षाला एक एमटीपेक्षा जास्त उत्पादन होते.

अशा सर्व 97 कोळसा खाणींसाठी, भूसंपादन, वन मंजुरी, पर्यावरण मंजुरी, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि रस्ते कनेक्टिव्हिटीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि कालमर्यादा निश्चित करण्यात आली. विशेष बाब म्हणजे कोळसा कंपन्यांच्या निरंतर प्रयत्नांमुळे 97 कोळसा खाणींपैकी 56 खाणींमध्ये कोणतेही प्रलंबित प्रश्न नाहीत. केवळ 41 खाणींमध्ये 61 समस्या  आहेत, ज्यासाठी कोळसा कंपन्यांच्या उच्च व्यवस्थापनाद्वारे संबंधित राज्य सरकारी अधिकारी आणि केंद्रीय मंत्रालयांसोबत सातत्यपूर्ण समन्वय आणि देखरेख केली जात आहे.

सीआयएल ने 2021-22 या वर्षात 622 एमटी उत्पादन केले आहे आणि 2022-23 या वर्षात 16% पेक्षा जास्त वाढ नोंदवत आत्तापर्यंत 513 एमटी उत्पादन झाले आहे. सीआयएल चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले 700 एमटीचे लक्ष्य पार करेल आणि त्यानुसार 2023-24 साठी 780 एमटी लक्ष्य गाठेल अशी अपेक्षा आहे.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1891974) Visitor Counter : 148