गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
गेल्या 2 वर्षात पीएम स्वनिधीने दोन टप्प्यात 45.32 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 4,606.36 कोटी रुपयांची 40.07 लाखांपेक्षा अधिक कर्जे वितरित केली आहेत : हरदीप एस. पुरी
पीएम स्वनिधी फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी सुविधा पुरवून आर्थिक समावेशकतेच्या दिशेने एक व्यासपीठ प्रदान करते: हरदीप एस. पुरी
केंद्रीय मंत्री हरदीप एस पुरी यांनी राष्ट्रीय स्ट्रीट फूड महोत्सवाचे केले उद्घाटन
Posted On:
13 JAN 2023 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
- रस्त्यावरील विक्रेत्यांच्या राष्ट्रीय संघटनेने (NASVI) 12 वा राष्ट्रीय स्ट्रीट फूड महोत्सवाचे आयोजन केले आहे.
- रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील पाककृती सादर करण्यासाठी हे एक अनोखे व्यासपीठ आहे.
- “माझा विश्वास आहे की या व्यासपीठामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी रोजगाराच्या संधी बळकट करण्याची क्षमता देखील आहे.” - हरदीप एस. पुरी
पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी ) बद्दल आज एका कार्यक्रमात बोलताना, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी म्हणाले की या योजनेला देशभरातील रस्त्यावरील विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आणि केंद्र सरकारची सर्वात वेगाने वाढणारी सूक्ष्म-कर्ज पुरवठा योजना बनली आहे. गेल्या दोन वर्षांत, पीएम स्वनिधीने दोन टप्प्यात 45.32 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 4,606.36 कोटी रुपयांची 40.07 लाखांपेक्षा अधिक कर्जे वितरित केली आहेत.
डिजिटल इंडिया संकल्पनेनुसार , पीएम स्वनिधीने रस्त्यावरील विक्रेत्यांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी सुविधा पुरवून आर्थिक समावेशकतेच्या दृष्टीने एक व्यासपीठ देखील प्रदान केले आहे. मला सांगायला आनंद होत आहे की, आतापर्यंत रस्त्यावरील विक्रेत्यांनी 45,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 37.70 कोटी डिजिटल व्यवहार केले आहेत. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने डिजिटल व्यवहारांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी लाभार्थ्यांना 23.02 कोटी रुपये कॅशबॅक म्हणून जारी केले आहेत .”अशी माहिती हरदीप एस. पुरी यांनी दिली.
रस्त्यावरील विक्रेत्यांच्या राष्ट्रीय संघटनेतर्फे (NASVI) आयोजित 12 व्या राष्ट्रीय स्ट्रीट फूड महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील पाककृती सादर करण्यासाठी हे एक अनोखे व्यासपीठ आहे" असे ते म्हणाले.
"गेल्या काही वर्षांत रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या विविध यशोगाथांकडे लक्ष वेधणारी ही एक अभिनव कल्पना आहे,आणि लोकही स्थानिक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत आहेत ." असे ते म्हणाले.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891151)
Visitor Counter : 167