कोळसा मंत्रालय
कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावासाठी 13 जानेवारी 2023 पर्यंत बोली सादर करता येणार
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2023 9:07AM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाने 03 नोव्हेंबर 2022 रोजी 141 कोळसा खाणींसाठी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाच्या 6व्या टप्प्याचा आणि 5व्या टप्प्याच्या दुसऱ्या लिलावाला सुरूवात केली. गुंतवणूकदारांच्या विविध मागण्या लक्षात घेऊन सध्या सुरू असलेल्या कोळसा खाणींची निवड करण्यात आली आहे; उद्योगांच्या अभिप्रायाच्या आधारे काही कोळसा खाणींचा आकार बदलून त्यांना गुंतवणूकीसाठी अधिक आकर्षक केले आहे.
लिलावात भाग घेऊ इच्छिणारे, वेळापत्रकानुसार, 13 जानेवारी 2023 पर्यंत 12:00 वाजेपर्यंत इलेक्ट्रॉनिक मंचावर ऑनलाइन आणि त्याच दिवशी 16:00 वाजेपर्यंत प्रत्यक्ष आपली बोली नोंदवू शकतात. सोमवार, 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता बोलीदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निविदा उघडल्या जातील.
***
Sushama K/Vinayak G/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889915)
आगंतुक पटल : 299