नौवहन मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 जानेवारी रोजी पांडू येथील जहाज दुरुस्ती केंद्र आणि पांडू बंदराला जोडणारा रस्ता यांची कोनशीला रचली जाणार तसेच सागरी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन होणार : केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची माहिती

Posted On: 09 JAN 2023 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

 

आसाम राज्यातील अंतर्गत जलमार्गांच्या विकासासाठी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने नियोजित केलेल्या प्रमुख उपक्रमांची केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज गुवाहाटी येथे घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 13 जानेवारी रोजी दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची कोनशीला बसवण्यात येणार आहे तर गुवाहाटी येथील पांडू बंदराची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या सागरी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत. इतर प्रकल्पांमध्ये पांडू बहु-पद्धती टर्मिनल येथील जहाज दुरुस्ती केंद्र तसेच पांडू येथील बहु-पद्धती टर्मिनलला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 शी जोडणारा उन्नत मार्ग यांचा समावेश आहे. या सुविधा आसाम राज्य तसेच संपूर्ण ईशान्य भागातील अंतर्गत जलमार्ग सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने नियोजित केलेल्या प्रमुख उपक्रमांचा भाग आहेत.

येत्या काळात, आसाम मधील अंतर्गत जलमार्गांच्या विकासासाठी 1016 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची देखील घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी केली.

या प्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आमच्या मंत्रालयाने या भागातील जलमार्गांना आर्थिक प्रगती, वृद्धी आणि या भागाचा विकास साधण्यासाठीचे मार्ग म्हणून रुपांतरीत करण्याच्या दृष्टीने त्यांना सशक्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. जलमार्गांच्या माध्यमातून मालवाहतूक किंवा प्रवाशांच्या वाहतुकीसाठी आम्ही या भागातील क्षमता निर्मितीसाठी नियोजन करून धोरणांची अंमलबजावणी करत आहोत.

पांडू टर्मिनल येथील जहाज दुरुस्ती केंद्रामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. ईशान्य प्रदेशासाठीचे सागरी कौशल्यविकास केंद्र आपल्या देशातील समृद्ध प्रतिभा भांडाराचा सन्मान करण्यासाठी तसेच वाढत्या मालवाहतूक उद्योगांमध्ये अधिक उत्तम रोजगार संधी मिळण्यासाठी कामगारांना अत्यंत उपयुक्त असणारी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889879) Visitor Counter : 144