आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्‍मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत येत असलेल्या रुग्णालयांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप आणि दर्जा ठरवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) नवीन प्रणाली केली सुरू


आरोग्यसेवा प्रदात्यांना रुग्णकेंद्रित सेवांच्या पुरवठ्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि चालना देण्‍याचे नवीन प्रणालीचे उद्दिष्ट

Posted On: 09 JAN 2023 3:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

 

रुग्णालयांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करण्यासाठी रुग्णालये पुरवत असलेल्या आरोग्य सेवांच्या प्रमाणापेक्षा त्या सेवांच्या दर्जावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत येत असलेल्या  रुग्णालयांच्या कामगिरीचे मोजमाप आणि दर्जा ठरवण्यासाठी नवीन प्रणाली सुरू केली आहे.

परंपरेनुसार, रक्कम देणाऱ्याच्या  दृष्टीकोनातून, आरोग्यसेवेचे प्रारूप हे सेवांच्या प्रमाणावर केंद्रित असते, जिथे त्या त्या विशिष्ट केससाठी  किती सेवा पुरवल्या यावर आधारित एकत्रित रक्कम दिली जाते. नवीन प्रणालीत मूल्यावर आधारित सेवा या नवीन दृष्टिकोनावर भर देण्यात आला आहे. या प्रणालीत देय रक्कम ही परिणामांवर आधारित असेल आणि प्रदात्याना वितरित उपचारांच्या गुणवत्तेनुसार पुरस्कृत केले जाईल. नवीन प्रणालीनुसार सेवा देणाऱ्यांनी रुग्णांना त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी दिलेल्या गुणवत्तापूर्ण उपचारांसाठी पुरस्कृत केले जाईल, ज्यामुळे लोकसंख्येवरील दीर्घकालीन रोगाचा प्रभाव कमी होईल.

याद्वारे रुग्णांच्या  एकूण आरोग्य लाभांमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि रुग्णांपासून ते आरोग्य सेवा प्रदाते, देयक आणि पुरवठादारांपर्यंत सर्व संबंधित भागधारकांसाठी ते अतिशय सुखावह असेल. यामुळे रुग्णांना उत्तम आरोग्य प्राप्ती होण्यासाठी मदत होईल आणि त्यांना मिळत असलेल्या आरोग्यसेवांबाबत समाधान देखील मिळेल, तर सेवा प्रदात्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवण्याची संधी मिळेल. त्याचप्रमाणे, रुग्णांनी खर्च केलेल्या रकमेतून मिळणारे आरोग्य लाभ वाढायला  मदत होईल.

“प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना निर्धारित केलेल्या प्रत्येक पॅनेल केलेल्या रुग्णालयात कॅशलेस आरोग्य विषयक फायदे आणि उच्च दर्जाची काळजी दोन्ही मिळतील याची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत, अशी माहिती या उपक्रमाबाबत बोलताना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आर.एस. शर्मा यांनी दिली. या उपायांमध्ये योजनेंतर्गत उपचारांच्या खर्चाचे प्रमाणीकरण करणे तसेच नवीन आणि प्रगत उपचार प्रक्रिया समाविष्ट करणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रोत्साहन देण्याची तरतूद केली आहे.” असेही त्यांनी सांगितले. 

मूल्य-आधारित आरोग्य सेवा प्रणालीमध्ये प्रदाते आपल्या देयकांवर योग्य खर्च नियंत्रण देखील ठेऊ शकतात. कमी दावे असलेले निरोगी लाभार्थी देयकांच्या प्रीमियम पूल्स आणि गुंतवणुकीवर कमी खर्चात रुपांतरण करु शकतात. यामुळे पुरवठादारांना त्यांची उत्पादने आणि सेवा सकारात्मक रुग्ण परिणाम आणि कमी खर्चासह संरेखित करण्यात सक्षम होण्याचा फायदा होईल. एकूणच, मूल्य-आधारित आरोग्य सेवा भारतातील आरोग्य सेवा प्रदात्यांना रुग्णकेंद्रित सेवा देण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन देऊन आरोग्यसेवा क्षेत्रात लक्षणीय सुधारणा करण्याचे वचन देते.

मूल्य-आधारित काळजी अंतर्गत, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) नामांकित रुग्णालयांची कामगिरी पाच कामगिरी संकेतकांनुसार मोजली जाईल जसे की: 1. लाभार्थी समाधान; 2. रुग्णालय पुनर्भरती दर; 3. खिशाबाहेरील खर्चाची व्याप्ती; 4. पुष्टी केलेल्या तक्रारी आणि 5. रुग्णाच्या आरोग्य-संबंधित जीवनाची गुणवत्ता सुधारणे.

वरील संकेतकांवर आधारित रुग्णालयांची कामगिरी सार्वजनिक डॅशबोर्डवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे लाभार्थ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. अशाप्रकारे, रुग्णालयाची कामगिरी केवळ रुग्णालयाचे आर्थिक प्रोत्साहनच ठरवणार नाही तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थी दर्जेदार उपचारांची मागणी देखील निर्माण करेल.

कार्यक्षमतेचे मूल्यांकन आणि मूल्य-आधारित प्रोत्साहन, आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनाचा वापर आणि काळजीच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर एकत्रित उपाय योजनांमुळे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि भारतीय आरोग्य प्रणाली आकार-आधारित वरून मूल्य-आधारित आरोग्य सेवा वितरण प्रणालीमध्ये रुपांतरीत होतील.

 

* * *

S.Bedekar/B.Sontakke/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889756) Visitor Counter : 311