पंतप्रधान कार्यालय
केशरीनाथ त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2023 9:16AM by PIB Mumbai
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल तसेच बिहार, मेघालय आणि मिझोराम या राज्यांचा अल्प कालावधीसाठी राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार पाहिलेल्या श्री केशरी नाथ त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे उत्तरप्रदेशमधील भाजपच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि राज्याच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"श्री केशरीनाथ त्रिपाठी हे त्यांच्या सेवेसाठी आणि बुद्धीसाठी आदरणीय स्थानी होते. त्यांना घटनात्मक बाबींची उत्तम जाण होती. त्यांनी यूपीमधील भाजपच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि राज्याच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे.त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि चाहत्यांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो ओम शांती.”
****
M.Jaybhaye/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889517)
आगंतुक पटल : 239
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam