वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री गतिशक्ती अंतर्गत सामाजिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांशी संबंधित डेटा स्तरांचे मॅपींग केले जाणार

Posted On: 07 JAN 2023 5:12PM by PIB Mumbai

 

आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन, ग्रामपंचायती, महानगरपालिका, समाजकल्याण, गृहनिर्माण इत्यादींशी संबंधित महत्त्वाच्या मालमत्तेवरील डेटा स्तरावर मॅपींग केले जात आहे आणि भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांच्या नियोजनात प्रधानमंत्री गतिशक्ती तत्त्वांचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी डेटा प्रमाणीकरण केले जात आहे. उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभागाचे विशेष सचिव (लॉजिस्टिक्स) यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमधील वाणिज्य भवन येथे आयोजित सामाजिक क्षेत्रातील मंत्रालये /विभागांच्या ऑनबोर्डिंग आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली.

या बैठकीला शहरी व्यवहार मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग, आदिवासी कार्य मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, विभागाचे अधिकारी उपस्थित होते. क्रीडा, ग्रामीण विकास मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, पोस्ट विभाग आणि गुजरात मधील भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लीकेशनस् जिओ इनफॉरमेटिक्स (BISAG-N) चे प्रमुख उपस्थिती होते. 12 मंत्रालये/ विभागांना सामील  केले गेले असून ते आता NMP प्लॅटफॉर्मवर डेटा एकत्रीकरणाच्या प्रगत टप्प्यावर आहेत. यामध्ये शाळा, रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्र इत्यादीसारख्या महत्त्वाच्या स्तरांचा समावेश आहे.

भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लीकेशनस् जिओ इनफॉरमेटिक्सने (BISAG-N) या बैठकीत निर्णय घेणे आणि नियोजन साधने, आदर्श विद्यार्थांनी संपर्क आणि आपत्ती व्यवस्थापन नियोजन यासारख्या प्रकरणांचा वापराबरोबरच सामाजिक क्षेत्रातील मंत्रालये/ विभागांकडून NMP स्वीकारण्याचे फायदे यावर सादरीकरण केले.

मंत्रालये /विभागांनी गतीशक्तीचा अवलंब करण्याची प्रगती, NMP प्लॅटफॉर्मवर एकत्रित होऊ शकणारे डेटा स्तर आणि एकीकरण प्रक्रियेदरम्यान मंत्रालये/ विभागांसमोर येणाऱ्या आव्हानांचे सादरीकरण केले.

सादरीकरणांनंतर सहभागींसोबत चर्चा झाली, मनोरंजक आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या उपयुक्त कल्पना निर्माण झाल्या, जसे की, प्रवेशयोग्यतेच्या संदर्भात अंगणवाडी केंद्रांचे मॅपिंग, उद्योगाशी संबंध वाढवण्यासाठी नवीन तांत्रिक संस्था स्थापन करण्यासाठी स्थानाचे मूल्यांकन, शाळांच्या स्थानांचे विश्लेषण आणि कोणत्याही संपर्क सुविधेबाबतच्या समस्या ओळखणे इत्यादी.

****

G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1889389) Visitor Counter : 206