श्रम आणि रोजगार मंत्रालय

बेरोजगारी दराबाबतच्या वृत्ताचे खंडन


खाजगी संस्थांद्वारे करण्यात आलेली सर्वेक्षणे साधारणपणे शास्त्रीय नसतात आणि जागतिक स्तरावरील निकषांना धरुनही नसतात

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे ‘रोजगार-बेरोजगारी’ विषयक प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत आकडेवारी वेळोवेळी केलेल्या श्रमशक्ती सर्वेक्षणावर -पीएलएफएसवर आधारित आहे

पीएलएफएस नुसार, भारतात रोजगाराचा दर कोविडच्या धक्क्यातून सावरला तर आहेच; शिवाय सध्या तो कोविड-पूर्व काळापेक्षाही अधिक उच्च पातळीवर आहे

Posted On: 04 JAN 2023 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

डिसेंबर 2022 मध्ये, देशात बेरोजगारी दर उच्च स्तरावर असल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या. या बातम्या, एका खाजगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीवर आधारित आहेत. इथे याचा उल्लेख करायला हवा, की अनेक खाजगी कंपन्या/संस्था त्यांच्या स्वत:च्या पद्धतीनुसार, त्यांच्याकडे उपलब्ध आकडेवारीनुसार सर्वेक्षण करतात, हे सर्वेक्षण शास्त्रीय नसते तसेच, जागतिक पातळीवर स्वीकारल्या गेलेल्या निकषांना धरुनही नसते. त्याशिवाय, या कंपन्या/संस्थांमध्ये बेरोजगारीचा आकडा अधिक सांगणे तर रोजगाराचा आकडा कमी सांगण्याविषयीचा एक पूर्वग्रह आढळतो.  याचे कारण, त्यांची स्वतःची नमुना प्रक्रिया आणि रोजगार/बेरोजगारीविषयक डेटा संग्रहित करतांना त्यांनी केलेल्या व्याख्या हे असते. त्यामुळे, अशा सर्वेक्षणाच्या निष्कर्षांकडे डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही. 

"रोजगार-बेरोजगारी" वरील अधिकृत डेटा (माहिती) सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) वेळोवेळी केलेल्या श्रमशक्ती सर्वेक्षणा (PLFS) वर आधारित जारी केला आहे.

पीएलएफएसचा जुलै, 2020 ते जून, 2021 या कालावधीतील सर्वेक्षण अहवाल, अंदाजे चित्र सांगण्यासाठी, अखिल भारतीय स्तरावर उपलब्ध आहे. शहरी भागांसाठी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे प्रकाशित पीएलएफएस तिमाही अहवाल देखील प्रसिद्ध केला जातो. हे तिमाही अहवाल जुलै - सप्टेंबर 2022 पर्यंत उपलब्ध आहेत.

उपलब्ध पीएलएफएसच्या अहवालानुसार, कामगार लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तीसाठी रोजगार हे 2019 मधील याच तिमाहीत 43.4% च्या तुलनेत जुलै - सप्टेंबर 2022 दरम्यान 44.5% च्या पातळीवर होते. जुलै-सप्टेंबर, 2022 दरम्यान बेरोजगारीचा दर जुलै-सप्टेंबर, 2019 मधील 8.3% च्या तुलनेत 7.2% च्या स्तरावर होता. अशा प्रकारे, पीएलएफएसच्या आकडेवारीनुसार, रोजगार दर कोविड-19 च्या धक्क्यातून सावरला तर आहेच, तसेच कोविडपूर्व काळापेक्षा उच्च पातळीवर पोहोचला आहे.

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888658) Visitor Counter : 206