खाण मंत्रालय

तांत्रिक सहकार्यासाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचा आयआयटी (आयएसएम), धनबादसोबत सामंजस्य करार


खनिज उत्पादनात तीन पट वाढीसाठी एचसीएल प्रयत्नशील

Posted On: 04 JAN 2023 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

कोलकाता येथील एचसीएल कॉर्पोरेट कार्यालयात हिंदुस्तान कॉपर लिमिटेड आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन स्कूल ऑफ माइन्स), धनबाद यांच्यात सहयोगी आणि प्रायोजित संशोधन प्रकल्पांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. एचसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार शुक्ला, आयआयटी (आयएसएम), धनबादचे संचालक प्रा. राजीव शेखर यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

आयआयटी (आयएसएम), धनबाद सह हे पहिले तांत्रिक सहकार्य, एचसीएलसाठी एक महत्त्वाची संधी आहे, देशातील तांबे धातूच्या  सर्व भाडेतत्वावर दिलेल्या कार्यरत खाणपट्ट्यांची  मालकी असलेली एचसीएल भारतातील एकमेव तांबे खाण  कंपनी आहे. सध्या, बहुसंख्य धातूंचे  उत्पादन केवळ भूमिगत पद्धतीने होते आणि खनिज उत्पादनाची पातळी दरवर्षी सुमारे चार दशलक्ष टन आहे.

धातूच्या जटिल भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांमुळे आणि खाणकामासाठी वाढलेल्या खोलीमुळे, उत्पादन प्रक्रियेदरम्यान, , सुरक्षा मानके राखणे आणि उद्भवणाऱ्या शाश्वततेसंदर्भातील समस्यांवर मात करण्यासह   तांत्रिक/कार्यान्वयन आणि विविध भौगोलिक-तांत्रिक तसेच भूजल संबंधित  समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

धातूची उत्पादन क्षमता तीन पटीने वाढवण्यासह एचसीएल त्याच्या विस्ताराच्या टप्प्यात आहे, याअंतर्गत प्रकल्पांमधील विकास उपक्रम एकतर चालू आहेत किंवा त्यातील बहुतेक खाणींमध्ये योजना आधीच लागू करण्यात आल्या आहेत.सध्या, उत्खनन केलेल्या खनिजावर   एचसीएलच्या स्वत:च्या  धातू  प्रक्रिया संयंत्रामध्ये  प्रक्रिया केली जाते आणि शुद्ध धातूची  (एमआयसी ) अंशतः देशांतर्गत बाजारात आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली जाते,

आयआयटी-आयएसएम, धनबाद ही विशेषतः खनिजांचे खनिकर्म आणि त्याचे फायदे तसेच  पृथ्वी विज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय प्रख्यात संस्था असून एचसीएलच्या दृष्टीकोन आधारित विस्तार कार्यक्रमाला साकार  करण्यासाठी उदयोन्मुख भूवैज्ञानिक, तांत्रिक, पर्यावरणीय, शाश्वत आणि धातू प्रक्रिया संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खाणकाम पद्धतींमध्ये बदल करून तांबे धातूचे उत्पादन वाढवणे,खाणींमधील उत्पादकता आणि सुरक्षितता यात सुधारणा करणे, पर्यावरण मंजुरी समस्या,विविध जलविज्ञान आणि जल-भूवैज्ञानिक अभ्यास आणि भूभौतिकीय अन्वेषण सारख्या   अपारंपरिक अन्वेषण पद्धती  त्याचप्रमाणे खोलवर असलेल्या तांब्याच्या धातूच्या  शोधासाठी रिमोट सेन्सिंग इ.साठी हा  सामंजस्य करार एचसीएलला आयआयटी -आयएसएमकडून तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन आणि सल्लामसलत संदर्भातील आवश्यकता पूर्ण करेल.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888609) Visitor Counter : 129


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu