पंतप्रधान कार्यालय

सिद्धेश्वर स्वामी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

Posted On: 02 JAN 2023 11:59PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सिद्धेश्वर स्वामीजींच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. परमपूज्य  सिद्धेश्वर स्वामीजी, समाजासाठी केलेल्या अतुलनीय सेवेसाठी कायम स्मरणात राहतील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

"परमपूज्य  सिद्धेश्वर स्वामीजी, समाजासाठी केलेल्या अतुलनीय सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी इतरांच्या भल्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या विद्वत्तेसाठी ते आदरणीय राहिले.  या दुःखाच्या प्रसंगी माझ्या सहवेदना त्यांच्या असंख्य भक्तांसोबत आहेत. ओम शांती."

***

सुवर्णा बेडेकर/ विनायक घोडे/सी यादव

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888202) Visitor Counter : 164