रेल्वे मंत्रालय
रेल्वेच्या महसुलात प्रवासी विभागात 71% वाढ
रेल्वेने आरक्षित प्रवासी विभागात 46% आणि अनारक्षित प्रवासी विभागात 381% वाढ नोंदवली
Posted On:
02 JAN 2023 5:38PM by PIB Mumbai
एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत भारतीय रेल्वेने प्रवासी विभागात एकूण अंदाजे उत्पन्न 48913 कोटी रुपये इतके मिळवले असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळालेल्या 28,569 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 71 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आरक्षित प्रवासी विभागात, 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत आरक्षण केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 59.61 कोटी आहे जी मागील वर्षी याच कालावधीत 56.05 कोटी होती, यामध्ये 6% ची वाढ दर्शवत आहे. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत आरक्षित प्रवासी विभागातून प्राप्त झालेला महसूल 38483 कोटी रुपये आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील 26400 कोटी रुपयांच्या तुलनेत 46% ची वाढ दर्शवतो.
अनारक्षित प्रवासी विभागात, 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत आरक्षण केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 40197 लाख आहे जी मागील वर्षी याच कालावधीत 16968 लाख होती, यामध्ये 137% ची वाढ झाल्याचे दिसून येते. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत अनारक्षित प्रवासी विभागातून प्राप्त झालेला महसूल 10430 कोटी रुपये आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील 2169 कोटी रुपयांच्या तुलनेत 381% ची वाढ दर्शवतो.
***
S.Patil/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888084)
Visitor Counter : 210