नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिसेंबर महिन्यात मासिक स्तरावरील मालाची आतापर्यंतची विक्रमी वाहतूक करून पारादीप बंदराने वर्ष 2022 ला दिला निरोप

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2023 11:01AM by PIB Mumbai

पारादीप बंदरासाठी 2023 या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहवर्धक झाली.  कारण पारादीप बंदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  डिसेंबर 2022 मध्ये 12.6 एमएमटी च्या सर्वकालीन विक्रमी कार्गो हाताळणीसह देशातील सर्व प्रमुख बंदरांच्या इतिहासात मासिक स्तरावरील मालाची आतापर्यंतची सर्वाधिक वाहतूक करून वर्ष 2022 ला निरोप दिला. पी पी ए चे अध्यक्ष पी. एल. हरनाध यांनी या शानदार कामगिरीबद्दल पीपीए टीमचे अभिनंदन केलेआहे.  नवीन वर्ष-  2023 देखील या बंदरासाठी लाभदायक ठरणार असे चिन्ह आहे,  कारण जानेवारी महिन्यातच पारादीप बंदर 100 एमएमटी  कार्गो हाताळणीचा उल्लेखनीय असा टप्पा ओलांडण्यासाठी सज्ज झाले आहे. चालू आर्थिक वर्षात  125 एमएमटी इतक्या विक्रमी मालाची हाताळणी करण्याचे पारादीप बंदराचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर 2022 पर्यंत पीपीएने गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 83.6 एमएमटीच्या तुलनेत 96.81 एमएमटी  माल हाताळला आहे. यावर्षी बंदराने अनेकविध सुधारणा आणि उपाययोजना केल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत बंदराच्या उलाढालीत यंदा 15.5% वृद्धीची नोंद झाली आहे. ‘कोस्टल थर्मल कोळसा हाताळणी’मध्‍ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत उल्लेखनीय 58.11% वाढ दर्शविली आहे आणि ती बंदरात हाताळल्या जाणार्‍या एकूण मालवाहतुकीच्या 31.56% आहे. पारादीप बंदर हे देशाचे किनारपट्टी शिपिंग केंद्र  म्हणून उदयास येत आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे असलेल्या विद्युत निर्मिती केंद्रांना ‘कोस्टल शिप थर्मल’  कोळसा पोहोचि‍वण्याची योजना तयार केली  आहे.

***

सुवर्णा बेडेकर/ भक्‍ती सोनटक्‍के/सी यादव

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1887979) आगंतुक पटल : 277
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Odia , Tamil , Telugu