आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केंद्रीय क्षयरोग विभाग यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य कराराचे डॉ मनसुख मांडविया आणि हरदीप सिंह पुरी यांनी केले स्वागत


2025 पर्यंत भारतातील क्षयरोग संपुष्टात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला हा सामंजस्य करार बळ देईल: डॉ मांडविया

2022 मध्ये भारतात क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये 18% घट दिसून आली

Posted On: 28 DEC 2022 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2022

 

क्षयरोग निर्मूलन करण्यासाठीची भारताची वचनबद्धता अधोरेखित करत प्रभावीपणे क्षयरोग निर्मूलन प्रकल्प हाती घेण्याच्या अनुषंगाने, इंडियन ऑइलने  (इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड) त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाचा  (सीएसआर ) भाग म्हणून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय क्षयरोग  विभाग (सीटीडी ) आणि उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांसोबत सामंजस्य करार करून ऐतिहासिक टप्पा गाठला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह  पुरी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

भारतातील मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये क्षयरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.  2025 पर्यंत भारतातील क्षयरोग संपुष्टात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला हा सामंजस्य करार बळ देईल असे  डॉ मांडविया   यांनी यावेळी सांगितले.  2022 मध्ये भारतात क्षयरोगाच्या  रुग्णांमध्ये 18% घट दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध टप्प्यांवर क्षयरोगाच्या सर्व पैलूंवर  मात करणाऱ्या   बहु-आयामी दृष्टिकोनासह   महत्वाकांक्षी क्षयरोग प्रतिबंधक मोहीमेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाचा  भाग म्हणून सुरु करत असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट , घराजवळच उच्च-संवेदनशीलता निदान चाचण्यांचा वापर करून संभाव्य क्षयरोग  लवकर ओळखणे  आणि त्वरित निदान सुनिश्चित करणे  हे आहे. उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील लोकांना विनामूल्य  उच्च-दर्जाचे क्षयरोग उपचार, आरोग्य सेवा आणि सहाय्य सेवांमध्ये शाश्वत आणि न्याय्य लाभ  प्रदान करणे हे देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

या अथक प्रयत्नांसह , राज्याच्या  प्रयत्नांना पूरक म्हणून, उत्तर प्रदेश  मधील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये , या राजाच्या  लोकसंख्येच्या अंदाजे 10% लोकसंख्‍येपर्यंत तीन वर्षांसाठी   वर्षातून एकदा पोहोचण्यासह  जवळपास 64 कोटींची गुंतवणूक करून क्षयरोग रुग्ण  शोध मोहीमेमध्ये  (एसीएस ) इंडियन ऑइल ही पहिली कंपनी म्हणून उदयास आली  आहे. इंडियन ऑइल उत्तर प्रदेशमध्ये अत्याधुनिक निदान तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या 18 फिरत्या वैद्यकीय  व्हॅन देखील उपलब्ध करून देणार आहे. या फिरत्या व्हॅन ग्रामीण भागात आणि पोहोचण्यास कठीण असलेल्या समुदायांमध्ये क्षयरोगाचे निदान करण्यात मदत करतील ज्यामुळे क्षयरोगाचे रुग्ण लवकर शोधणे  आणि   लवकर उपचार सुनिश्चित होईल. इंडियन ऑइल एक किफायतशीर, विशिष्ट  मोलेक्युलर निदान मशीन प्रदान करेल, जी उत्तर प्रदेशच्या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि छत्तीसगडच्या दुर्गम आदिवासी भागात क्षयरोग  निदान सेवांचा प्रवेश, उपलब्धता आणि वापर यात सुधारणा करेल.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887064) Visitor Counter : 138