सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
वर्ष अखेर आढावा – 2022: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
Posted On:
26 DEC 2022 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2022
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र सहा कोटींहून अधिक उद्योगांसह भारतीय अर्थव्यवस्थेचे एक अत्यंत उत्साही आणि गतिमान क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. व्यावसायिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या क्षेत्राचा कृषी क्षेत्राखालोखाल क्रमांक लागतो. तुलनेने कमी भांडवली खर्चात हे क्षेत्र उद्योजकता आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करत आहे. खादी, ग्राम आणि कॉयर उद्योगासह इतर उद्योगांना हे मंत्रालय चालना देत आहे. पतपुरवठा सहाय्य, तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा विकास, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण, स्पर्धात्मकता आणि बाजारपेठ वाढवणे यासाठी विविध योजना/ कार्यक्रमांची अंमलबजावणी हे मंत्रालय करते.
उदयमी भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसएमई क्षेत्रासाठी 30 जून 2022 रोजी नवी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे आयोजित 'उद्यमी भारत' कार्यक्रमात प्रमुख उपक्रम सुरू केले. केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे आणि एमएसएमई राज्यमंत्री भानू प्रतापसिंह वर्मा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी एमएसएमईंना ‘राष्ट्रीय एमएसएमई पुरस्कार, 2022’ प्रदान केले. एमएसएमई क्षेत्राचा विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी एमएसएमई, राज्ये/केंद्रशासित प्रदेश, आकांक्षी जिल्हे आणि बँकांना हे पुरस्कार देण्यात आले.
पंतप्रधानांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची कामगिरी वाढविणारी आणि गतिमान करणारी रॅम्प योजना, पहिल्यांदा निर्यात करणाऱ्या एमएसएमई निर्यातदारांची क्षमता वाढवणारी सीबीएफटीइ योजना आणि नवीन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमइजीपी) यांचा आरंभ त्यांनी केला. त्यांनी 2022-23 साठी पीएमइजीपीच्या लाभार्थ्यांना डिजिटल हस्तांतरणाद्वारे मदत केली. त्यांनी एमएसएमई आयडिया हॅकेथॉन- 22 च्या विजेत्यांची घोषणा केली आणि 75 लाभार्थ्यांना सेल्फ रिलायंट इंडिया (एसआरआय) फंडाचे डिजिटल इक्विटी प्रमाणपत्र जारी केले.
धोरणात्मक उपक्रम
प्रकल्प गुंतवणूक, यंत्रसामग्री किंवा उपकरणे आणि उलाढाल यावर एमएसएमईची सुधारित व्याख्या आधारित आहे. तिचा अवलंब केल्यानंतर 1 जुलै 2020 रोजी उदयम नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले. हे पोर्टल पूर्णपणे ऑनलाइन, मोफत, त्रासमुक्त, कागदविरहीत आहे. एमएसएमईसाठी व्यवसाय सुलभ करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.
या पोर्टलवर 2 ऑगस्ट 2022 रोजी एक कोटीची नोंदणी झाली. 22 डिसेंबर 2022 पर्यंत या पोर्टलवर 1. 28 कोटी पेक्षा जास्त नोंदणी झाली.
एमएसएमईसाठी राष्ट्रीय मंडळ
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या राष्ट्रीय मंडळाची 17 वी बैठक 23 मार्च 2022 रोजी नवी दिल्लीच्या इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आणि 18 वी बैठक 14 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे झाली. त्यात एमएसएमई क्षेत्राला बळकटी देण्यासाठी चर्चा करण्यात आली.
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (आयआयटीएफ), 2022
केंद्रीय मएसएमई मंत्र्यांनी 41 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात एमएसएमई पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) ने 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान हा मेळावा आयोजित केला. वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल या संकल्पनेअंतर्गत 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून सहभागी होणार्याह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 204 स्टॉल्सचे वाटप करण्यात आले. एमएसएमई पॅव्हेलियनमध्ये महिलांच्या मालकीच्या उद्योगांचा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग होता (73%). एकूण स्टॉल पैकी 7% दिव्यांग उद्योजकांना, 12% अनुसूचित जाती (पुरुष) उद्योजकांना आणि 6% आकांक्षी जिल्ह्यांना मिळाले.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा प्रचार आणि ईशान्य भागात राष्ट्रीय अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती हब (एनएसएसएच) या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती/जमातींमधील उद्योजकतेला चालना देणे आहे. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांद्वारे केंद्र सरकारच्या खरेदी आदेश धोरणाची 4% पूर्तता करणे आणि अनुसूचित जाती/जमातींमधील उद्योजकतेला चालना देण्याचं काम हे हब करतात.
अनुसूचित जाती/जमातीतील 17,782 लाभार्थ्यांना जानेवारी 2022, नोव्हेंबर 2022 पासून मदत करण्यात आली. सहा मेगा कार्यक्रम/राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती हब कॉन्क्लेव्हचे आयोजन सिंधुदुर्ग, मणिपूर, तंजावर, नागालँड, मिझोरम, अहमदाबाद या अनुसूचित जाती/जमातींचे प्राबल्य असलेल्या भागात करण्यात आले.
परिषदा/शिखर परिषदा
एमएसएमई-विकास संस्था, चाचणी केंद्रे आणि तंत्रज्ञान केंद्रे यांची राष्ट्रीय परिषद 10 मे 2022 रोजी एमएसएम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. एमएसएमईच्या फायद्यासाठी राज्य सरकारे आणि इतर भागधारकांसह योजनांची उत्तम अंमलबजावणी तसेच देखरेख आणि समन्वयासाठी भविष्यातील योजना या विषयावर या परिषदेत चर्चा झाली. ‘आंतरराष्ट्रीय सहकार्य’ योजनेअंतर्गत मंत्रालयाने नवी दिल्लीत शिखर परिषदेचे आयोजन केले होते.
ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनसोबत
- ‘प्लास्टिक पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापनावर आंतरराष्ट्रीय मेगा-समिट’ 4 आणि 5 मार्च 2022 रोजी.
- ‘मेगा ग्लोबल एमएसएमई बिझनेस समिट’ या परिषदेत तंत्रज्ञान व्यावसायिकांचे सक्षमीकरण ही संकल्पना घेऊन 24 मार्च 2022रोजी चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक सॉफ्टवेअर निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या सहकार्याने ही परिषद भरली होती.
- ‘मेगा इंटरनॅशनल समिट ऑन एमएसएमई स्पर्धात्मकता आणि वाढ याविषयी 29 आणि 30 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय मेगा शिखरपरिषद झाली. मंत्रालयाने भारतीय उद्योजकता विकास संस्था (इडीआयआय) यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित केली.
- 30 आणि 31 मार्च 2022 रोजी संरक्षण आणि सुरक्षा या विषयावर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सहयोगातून झाली.
- एमएसएमईच्या योगदानाच्या संदर्भात संरक्षण आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
- प्लास्टिक उद्योगासाठी जागतिक एमएसएमई अधिवेशन 16 आणि 17 नोव्हेंबर 2022 रोजी रोजी गोवा येथे आयोजित करण्यात आले होते. अखिल भारतीय प्लास्टिक उत्पादक संघटनेच्या (एआयपीएमए) सहकार्यातून हे अधिवेशन भरले होते.
- सन 2022 मध्ये, एमएसएमई क्षेत्रातील सहकार्यावर संयुक्त समिती / संयुक्त कार्यगटाच्या बैठका केंद्र सरकारचे एमएसएमई मंत्रालय तसेच तैवान, मॉरिशस आणि जपानचे समकक्ष मंत्रालय/विभाग यांच्यात बैठका झाल्या. बैठकीमध्ये दोन्ही बाजूंनी एमएसएमई क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांची देवाणघेवाण केली.
- विकास आणि द्विपक्षीय सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांवर चर्चाही झाली.
* * *
S.Thakur/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887003)
Visitor Counter : 392