गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथील “सदैव अटल” स्मारकावर माजी पंतप्रधान भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिली आदरांजली
अटलजींची देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पित वृत्ती नेहमीच आपल्याला देशसेवेसाठी प्रेरित करेल.
भारतीय राजकारणाचे मेरुमणी अटलजींचे आयुष्य देशाला पुन्हा सर्वोच्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि सुशासनाच्या नव्या युगाचा पाया घालून त्यांनी भारताच्या क्षमतेची जगाला जाणीव करून दिली आणि जनतेमध्ये देशाभिमानाची भावना निर्माण केली.
आज अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन
Posted On:
25 DEC 2022 1:56PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथील “सदैव अटल” स्मारकावर माजी पंतप्रधान भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली.
आपल्या ट्वीटमध्ये अमित शाह म्हणाले की अटलजींची देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पित वृत्ती नेहमीच आपल्याला देशसेवेसाठी प्रेरित करेल. भारतीय राजकारणाचे मेरुमणी अटलजींचे आयुष्य देशाला पुन्हा सर्वोच्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित होते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि सुशासनाच्या नव्या युगाचा पाया घालून त्यांनी भारताच्या क्षमतेची जगाला जाणीव करून दिली आणि जनतेमध्ये देशाभिमानाची भावना निर्माण केली, असे त्यांनी सांगितले. आज त्यांच्या जयंती निमित्त मी त्यांना अभिवादन करत आहे.
***
R.Aghor/S.Patil.P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886519)
Visitor Counter : 194