पंतप्रधान कार्यालय
26 डिसेंबर रोजी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ‘वीर बाल दिवस’ या ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
तीनशे बाल कीर्तनकारांच्या ‘शबद कीर्तनालाही’ पंतप्रधान राहणार उपस्थित
सुमारे तीन हजार मुलांच्या मार्च पास्टला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील
Posted On:
24 DEC 2022 8:37PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 डिसेंबर 2022 रोजी, दुपारी साडेबारा वाजता दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ‘वीर बाल दिवसानिमित्त’ होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांचे ‘शबद कीर्तन’ होणार असून, पंतप्रधान त्यातही सहभागी होतील. तसेच, यावेळी नवी दिल्लीत निघणाऱ्या मुलांच्या मार्च पास्ट म्हणजेच फेरीलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.
साहिबजादे यांच्या असामान्य धैर्य आणि साहसाची कथा, देशातल्या सर्व नागरिकांपर्यन्त विशेषतः तरुण मुलांपर्यन्त पोहोचवून या इतिहासाविषयी त्यांना सचेत करण्यासाठी सरकार अनेक संवादात्मक आणि सहभागात्मक कार्यक्रमांचे संपूर्ण देशभर आयोजन करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, निबंध लेखन, प्रश्न मंजूषा आणि इतर उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच, रेल्वे स्थानके , पेट्रोल पंप, विमानतळे अशा सार्वजनिक ठिकाणी याविषयी माहिती देणारी डिजिटल प्रदर्शने लावली जातील. त्याशिवाय, संपूर्ण देशभरात, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील, जिथे, अनेक मान्यवर साहिबजादे यांचे आयुष्य आणि त्यांच्या बलिदानाची कथा लोकांना सांगतील.
श्री गुरु गोविंद सिंग यांचे सुपुत्र, साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी, यांच्या बलिदानाचा दिवस, 26 डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी, श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या प्रकाश पुरबच्या दिनी, म्हणजे 9 जानेवारी,2022 रोजी केली होती.
***
S.Kakade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886409)
Visitor Counter : 240
Read this release in:
Kannada
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil