युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडियाच्या ‘डॅशबोर्ड’चे केले अनावरण
डॅशबोर्डमुळे लोकांना खेलो इंडिया योजनेची सर्व माहिती सुलभतेने होणार उपलब्ध
Posted On:
23 DEC 2022 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
ठळक मुद्दे:
- या डॅशबोर्डवर ‘जिओटॅगिंग’सह खेळाच्या मैदानांची माहिती उपलब्ध आहे.
- युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे खेलो इंडियाच्या नवीन डॅशबोर्डचे अनावरण केले. या डॅशबोर्डवर खेलो इंडिया योजना आणि खेलो इंडियाच्या कार्यक्रमांशी संबंधित सर्व सांख्यिकी डेटा उपलब्ध आहे. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि एसएआय म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खेलो इंडिया डॅशबोर्ड ‘रिअल-टाइम’ वर अद्यतन केला जाईल. एक अनोखा ‘वन-स्टॉप प्लॅटफॉर्म’ बनवण्याचा या डॅशबोर्डचा उद्देश आहे. यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला खेलो इंडिया योजनेसंबंधी विविध प्रकारची ताजी आकडेवारी, इतर लाभ या संबंधी सर्व माहिती उपलब्ध असेल.

डॅशबोर्डविषयी बोलताना, अनुराग ठाकूर म्हणाले, “व्यवसाय सुलभता असो किंवा जगण्यासाठी सुकरता असो तसेच अनुपालनाची सुलभता असो, लोकांना गोष्टी सहज, सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात आणि प्रत्येक कामामध्ये पारदर्शकता यावी, याला भारत सरकारने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे. हाच विचार करून ‘खेलो इंडिया डॅशबोर्ड’ तयार करण्यात आला आहे. या अनोख्या व्यासपीठामुळे , प्रत्येक व्यक्तीला, मग तो सामान्य माणूस असो किंवा खेळाडू असो, सर्वांना खेलो इंडिया योजनेच्या संदर्भात आवश्यक असणारी सर्व माहिती मिळवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच कोणतीही माहिती मिळविण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी जावे लागणार नाही. या एकाच डॅशबोर्डवर जिओटॅगिंगसह खेळाच्या मैदानांची माहिती उपलब्ध आहे.”
केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या विधानाला जोडूनच क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक पुढे म्हणाले, " या प्लॅटफॉर्ममुळे लोकांना फक्त खेलो इंडिया योजनेची माहिती मिळण्यास मदत होणार आहे असे नाही, तर क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, फिट इंडिया आणि खेळाच्या मैदानाच्या विकासाबाबत झालेल्या प्रगतीची माहिती मिळविणेही शक्य होणार आहे."

या अनोख्या प्लॅटफॉर्मवर खेलो इंडियाची केंद्रे (केआयसीज्), खेलो इंडिया अकादमी, एसएआय प्रशिक्षण केंद्रे आणि नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओईएस) यासंबंधीची सर्व माहितीही उपलब्ध आहे. त्यामुळे खेळाडूंना विविध विषयांमध्ये क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध असलेले, आपल्या सर्वात जवळचे केंद्र शोधण्यासाठी मदत होईल. एखाद्या विशिष्ट खेळाचा पाठपुरावा करणार्या कोणत्याही खेळाडूला संपूर्ण भारतामध्ये त्याच्या आवडीच्या खेळाचे प्रशिक्षण केंद्र शोधण्यात मदत होणार आहे. यासाठी सर्व केंद्रांचे भारताच्या नकाशावर ‘जिओटॅग’ करण्यात आले आहे.
खालील लिंकच्या माध्यमातून खेलो इंडिया डॅशबोर्डवर प्रवेश करणे शक्य होणार आहे.
https://dashboard.kheloindia.gov.in/khelo_india_dashboard/
S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886188)
Visitor Counter : 184