पर्यटन मंत्रालय

पर्यटन उद्योग हा महिला कर्मचाऱ्यांना सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांपैकी एक - केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी

Posted On: 22 DEC 2022 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2022

ठळक वैशिष्ट्ये :

  • महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देऊन त्यांना यासंदर्भात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार उद्योग क्षेत्रातील भागधारकांशी विविध नियामक आणि ऐच्छिक उपायांद्वारे सातत्याने विचारविनिमय करत आहे.
  • केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

पर्यटनउद्योग हा असंघटित, हंगामी स्वरूपाचा आणि विभागलेला असल्याने या उद्योगातील कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते.  पर्यटन उद्योग हा महिला कर्मचाऱ्यांना सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे आणि महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देऊन त्यांना यासंदर्भात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार, उद्योग क्षेत्रातील भागधारकांशी विविध नियामक आणि ऐच्छिक उपायांद्वारे सातत्याने विचारविनिमय करत आहे.

भारत सरकारच्या विविध मंत्रालयांद्वारे प्रशासित केल्या जाणाऱ्या कायद्यांमधील विविध तरतुदी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षितता, समान संधी आणि अनुकूल कामाचे वातावरण प्रदान करतात.

यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  1. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020
  2. वेतन संहिता 2019
  3. मातृत्व लाभ कायदा, 1961 (2017 मध्ये सुधारित)
  4. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा, 2013

 

 

 

 

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1885832) Visitor Counter : 137