आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा (एबीडीएम) अवलंब करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी रुग्णालये, प्रयोगशाळा आणि डिजिटल आरोग्य सुविधा पुरवठादारांना 4 कोटींचा प्रोत्साहन निधी देणे हे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (एनएचए) उद्दीष्ट

Posted On: 22 DEC 2022 11:01AM by PIB Mumbai

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) डिजिटल आरोग्य परिसंस्थेतील भागधारकांसाठी डिजिटल आरोग्य प्रोत्साहन योजना (डीएचआयएस) जाहीर केली आहे. आयुष्मान भारत डिजिटल अभियाना (एबीडीएम) अंतर्गत देशातील डिजिटल आरोग्य व्यवहारांना आणखी चालना देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.  या योजनेंतर्गत रुग्णालये आणि निदान प्रयोगशाळांना तसेच रुग्णालये/आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) आणि प्रयोगशाळा व्यवस्थापन माहिती प्रणाली (एलएमआयएस) यांसारख्या डिजिटल आरोग्य उपाय पुरवठादारांना प्रोत्साहन निधी प्रदान केला जाईल.

डीएचआयएस अंतर्गत, पात्र आरोग्य सुविधा आणि डिजिटल सुविधा कंपन्या एबीएचएशी (आयुष्मान भारत आरोग्य खाते) जोडलेल्या डिजिटल आरोग्य नोंदींच्या संख्येवर आधारित 4 कोटी

रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन मिळवू शकतील.  एबीडीएम आरोग्य सुविधा नोंदणीत (एचएफआर) नोंदणीकृत आरोग्य सुविधांद्वारे (रुग्णालये आणि निदान प्रयोगशाळा) आणि योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करून हे प्रोत्साहन मिळू शकते.

एनएचएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा याबद्दल सविस्तर माहिती देताना, म्हणाले – “आम्हाला विश्वास आहे की ही योजना अधिकाधिक आरोग्य सेवा सुविधा आणि डिजिटल सॉफ्टवेअर कंपन्यांना पुढे येत, रुग्ण-केंद्रित आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी एबीडीएम मध्ये सामील होण्यास प्रोत्साहित करेल. या आर्थिक प्रोत्साहन योजनेद्वारे डिजिटल आरोग्य सुविधेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देत आहोत. आम्ही प्रोत्साहन योजनेमध्ये सुविधा (एचएमआयएस/एलएमआयएस) प्रदात्यांचा समावेश करत आहोत. यामुळे ते इतर आरोग्य सुविधांना सेवेत येण्यासाठी आणि परिसंस्थेच्या बळकटीकरणासाठी मदत करतील. युपीआय, टीबी प्रकरणांची अधिसूचना, जननी सुरक्षा योजना इ. सारख्या इतर नागरिक केंद्रित कार्यक्रमांचा लवकरात लवकर अवलंब करण्यात अशा प्रोत्साहनांनी उत्प्रेरक भूमिका बजावली आहे.”

एबीडीएमच्या डिजिटल आरोग्य प्रोत्साहन योजनेतील महत्त्वाचे मुद्दे:

खालील संस्थांना प्रोत्साहन दिले जाईल:

 10 किंवा अधिक खाटा असलेल्या आरोग्य सुविधा

 प्रयोगशाळा/रेडिओलॉजी निदान केंद्रे

डिजिटल सुविधा (सोल्यूशन) कंपन्या (एबीडीएम सक्षम डिजिटल सोल्यूशन्स प्रदान करणाऱ्या संस्था)

एबीएचए-संबंधित व्यवहारांच्या संख्येच्या आधारावर प्रोत्साहन प्रदान केले जाईल, म्हणजे डिजिटल आरोग्य नोंदी तयार करुन एबीएचए शी जोडणे.

 आरोग्य सुविधा

 पायाभूत पातळीचे निकष

 प्रोत्साहन

 रुग्णालये

प्रति खाट प्रति महिना 50 व्यवहार

रु.  20 प्रति अतिरिक्त व्यवहार पायाभूत पातळी वर

 निदान सुविधा/प्रयोगशाळा

 दरमहा 500 व्यवहार

रु.  15 प्रति अतिरिक्त व्यवहार पायाभूत पातळी वर

डिजिटल सुविधा (सोल्यूशन) कंपन्यांना (डीएससी) त्यांच्या डिजिटल उपायांचा वापर करून पात्र आरोग्य सुविधांकडून मिळालेल्या प्रोत्साहन रकमेच्या 25% प्रोत्साहन दिले जाईल.

थेट प्रोत्साहनासाठी पात्र नसलेल्या सुविधांद्वारे केलेल्या एबीएचएशी संलग्न व्यवहारांसाठी (दवाखाने/लहान रुग्णालये/आरोग्य लॉकर्स/टेलीकन्सल्टेशन मंच इ.), डिजिटल सुविधा कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाईल.

डिजिटल सुविधा (एचएमआयएस आणि (एलएमआयएस) कंपन्यांसाठी खर्च प्रोत्साहन

रुग्णालये/प्रयोगशाळेद्वारे त्यांचे सॉफ्टवेअर वापरून प्रत्येक व्यवहारासाठी आणि या धोरणांतर्गत प्रोत्साहने प्राप्त करणे

पात्र सुविधांद्वारे प्राप्त संबंधित प्रोत्साहन रकमेच्या 25%

इतर व्यवहारांसाठी (आरोग्य लॉकर्स, टेलिकन्सलटेशन मंच, लहान दवाखाने इ.) दरमहा 200 पेक्षा जास्त व्यवहार असल्यास

 रु.  5 प्रति व्यवहार

सार्वजनिक क्षेत्रातील सुविधांसाठी, रोगी कल्याण समितीच्या अंतर्गत निधीमध्ये प्रोत्साहने जोडली जातील.  प्रोत्साहन योजनेचा अंदाजे प्रारंभिक आर्थिक परिव्यय 50 कोटी असून तो  1 जानेवारी 2023 पासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असेल.


योजनेची तपशीलवार माहिती देण्यासाठी एनएचएद्वारे 23 डिसेंबर 2022 पासून सार्वजनिक वेबिनार आयोजित केले जातील. वेबिनारचे वेळापत्रक आणि लिंक https://abdm.gov.in/dhis या वेबसाइटवर उपलब्ध असेल. डीएचआयएसचा संपूर्ण तपशील येथे उपलब्ध आहे: https://abdm.gov.in:8081/uploads/Digital_Health_Incentive_Scheme_550e710e09.pdf

****

Gopal C/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1885676) Visitor Counter : 243