महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ष अखेर आढावा- 2022: महिला आणि बाल विकास मंत्रालय

Posted On: 21 DEC 2022 2:28PM by PIB Mumbai

वर्ष 2022 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे प्रमुख उपक्रम /उपलब्धी पुढीलप्रमाणे आहेत:

मंत्रालयाच्या विविध योजनांचे तीन गटांमध्ये संयोजन : उत्तम देखरेख आणि कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, देशातील महिला आणि मुलांसाठी मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांचे तीन गटांमध्ये संयोजन करण्यात आले आहे, उदा. (1) बालके, किशोरवयीन मुली आणि गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्या पोषण सहाय्यासाठी तसेच बालकांची काळजी आणि शिक्षणासाठी सक्षम अंगणवाडी आणि पोशन 2.0; (2) महिलांची सुरक्षितता, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती (३) मिशन वात्सल्य मुलांचे संरक्षण आणि कल्याण; 15 व्या वित्त आयोगात या गटांसाठी वाढीव खर्च अनुक्रमे 20,989 कोटी रुपये, 10,916 कोटी रुपये आणि 1,02,031 कोटी रुपये. 

 मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 01.08.2022 रोजी मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोशन 2.0 साठीची योजना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. तसेच, एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम – सक्षम अंगणवाडी आणि पोशन (2.0), नियम, 2022 दिनांक 12.09.2022 ला अधिसूचित केले आणि 06.10.2022 रोजी हे नियम प्रकाशित करण्यात आले. सक्षम अंगणवाडी आणि पोशन 2.0 अंतर्गत, आकांक्षी जिल्ह्यांमध्ये सुधारित पोषण आणि शिक्षण देण्यासाठी प्रतिवर्ष @ 40,000 प्रमाणे 2 लाख अंगणवाडी केंद्रांचे बळकटीकरण, श्रेणी सुधारणा आणि पुनरुज्जीवन केले जाईल. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, आकांक्षी जिल्ह्यांमधील सर्व 40,000 सक्षम अंगणवाड्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

  • आतापर्यंत अंगणवाडी सेविकांना 11.22 लाख स्मार्ट फोन देण्यात आले आहेत.

याशिवाय, मुलांच्या वाढीच्या नियमित निरीक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 12.65 लाख वाढ निरिक्षण उपकरणे जसे की, इन्फँटोमीटर, स्टॅडिओमीटर, माता आणि अर्भकासाठी वजन मापक, मुलांसाठी वजन मापक इ. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी खरेदी केली आहेत.

पोषण ट्रॅकर: महिला आणि मुलांच्या पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य, निरोगीपणा आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे पारदर्शक आणि सक्षम वातावरण तयार केले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पूरक पोषणाचे रिअल-टाइम मॉनिटरिंग सुनिश्चित करण्यासाठी तसेच सेवांच्या त्वरित पर्यवेक्षण आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक ती माहिती प्रदान करण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन तयार केले गेले आहे. 31.10.2022 पर्यंत, अंदाजे 9.84 कोटी लाभार्थींची नोंद झाली आहे. लास्ट माईल ट्रॅकिंग आणि सेवांचे योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी लाभार्थ्यांच्या आधाराची नोंदणी केली आहे. आजपर्यंत, पोशन ट्रॅकरवर नोंदणीकृत सुमारे 85.63% लाभार्थ्यांची यशस्वीरित्या 'आधार' नोंदणी केली आहे.

पोषण पंधरवडा (21 मार्च- 4 एप्रिल 2022)

राष्ट्रीय पोषण माह (सप्टेंबर 2022) 

मिशन शक्ती-

  मिशन शक्तीमध्ये महिलांची सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी अनुक्रमे ‘संबल’ आणि ‘सामर्थ्य’ या दोन उपयोजनांचा समावेश आहे. सध्या राबवण्यात येत असलेल्या वन स्टॉप सेंटर्स (OSC), महिला हेल्पलाइन्स (181-WHL) आणि बेटी बचाओ बेटी पढाओ (BBBP) या योजना संबल उप-योजनेचा भाग बनवण्यात आल्या आहेत. आणि, नारी अदालत हा घटक नव्याने सुरू करण्यात आला आहे; तर प्रधानमंत्री मातृ वंदन योजना (PMMVY), उज्ज्वला आणि स्वाधार गृह (शक्ती सदन), नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह (सखी निवास), लिंग लेखापरीक्षण आणि राष्ट्रीय शिशु गृह योजना या विद्यमान योजना तसेच राष्ट्रीय, राज्य, आणि जिल्हा स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी हबचा एक नवीन घटक ‘सामर्थ्य’ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मिशन शक्तीसाठीची योजना मार्गदर्शक तत्त्वे 14 जुलै 2022 रोजी जारी करण्यात आली.

 

बेटी बचाओ बेटी पढाओ : ही योजना देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहु-क्षेत्रीय माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनेने मुलींना महत्त्व देण्याबाबत राष्ट्राची मानसिकता बदलण्यासाठी सामूहिक चेतना जागृत केली आहे. याची परिणती म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर जन्माच्या वेळचे (SRB) लिंग गुणोत्तरामध्ये 16 गुणांनी सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. 

2014-15 मधील 918 असलेल्या जन्माच्या वेळच्या राष्ट्रीय स्तरावरील लिंग गुणोत्तर प्रमाणात (SRB) 16 गुणांची सुधारणा होऊन 2021-22 मध्ये (HMIS, MH&FW चे) हे गुणोत्तर 934 वर पोचले. 

कोविड-19 मुळे संकटात सापडलेल्या मुलांसाठी पीएम केअर्स फंड- पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना : कोविड-19 साथीच्या आजारामुळे दोन्ही पालक, एकल हयात पालक, कायदेशीर पालक किंवा दत्तक पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी, पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना 29 मे 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत एकूण 4345 मुले पात्र ठरली. 

 ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’: मुलांच्या कल्पना, हक्क आणि पोषण:

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ चा एक भाग म्हणून 1 ते 8 मार्च 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिन-सप्ताह ‘आयकॉनिक वीक’ म्हणून साजरा केला. आठवडाभर चालणाऱ्या उत्सवाचा भाग म्हणून, मंत्रालयाने महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाशी संबंधित अनेक विषयांवर विविध कार्यक्रम आणि सोशल मीडिया मोहिमांचे आयोजन केले.

या सप्ताहादरम्यान महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे (NCPCR) नवीन बोधवाक्य "भविष्यो रक्षित रक्षित:" लाँच केले. मंत्रालयाने वन स्टॉप सेंटर्सचे कर्मचारी आणि समुपदेशक यांच्या मनोसामाजिक प्रशिक्षणासाठी NIMHANS बेंगळुरूच्या सहकार्याने “स्त्री मनोरक्षा प्रकल्प” सुरू केला. बाल हक्क संरक्षण राज्य आयोग (SCPCRs) यांच्यासमवेत बाल हक्कांशी संबंधित समकालीन विषयांवर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आठवडाभरात, आंतरराष्ट्रीय महिला दिन (08 मार्च 2022) सप्ताहात, पूर्वीच्या किशोरवयीन मुलींसाठीच्या योजनेतील (SAG) शाळा सोडून दिलेल्या मुलींना (11-14 वर्षे) औपचारिक शिक्षण आणि/ किंवा कौशल्य प्रणालीकडे वळवण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि UNICEF India यांच्या सहकार्याने 'कन्या शिक्षा प्रवेश उत्सव' नावाची मोहीम सुरू करण्यात आली. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष समारंभात भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेत 29 उत्कृष्ट महिलांना नारी शक्ती पुरस्कार-2020 आणि 2021 प्रदान केले. पंतप्रधानांनी देखील नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.

केंद्रीयकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि संरक्षण प्रणाली (CPGRAMS) आवृत्ती 7.0- केंद्रीयकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि संरक्षण प्रणाली (CPGRAMS) आवृत्ती 7.0 ची अंमलबजावणी महिला आणि बालविकास मंत्रालयामध्ये जुलै 2022 पासून यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली.

***

 

S.Thakur/S. Mukhedkar/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1885647) Visitor Counter : 245