गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमृत 2.0 अंतर्गत गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या पेयजल सर्वेक्षणाची प्रत्यक्ष सुरुवात

Posted On: 21 DEC 2022 2:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2022

  • अमृत, अर्थात अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) 2.0 अंतर्गत 09 सप्टेंबर 2022 रोजी गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेय जल सर्वेक्षण सुरू केले होते.
  • हे अमृत मिशन साठी देखरेखीचे आणि या अभियानाचा वेग वाढविणारे साधन  म्हणून काम करेल, तसेच शहरांमधील निकोप स्पर्धा वाढवेल.  
  • मंत्रालयाने 15 डिसेंबर 2022 पासून जमिनीवरील प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे.
  • जल उपयोगिता सेवा, वापरलेल्या पाण्याची उपयोगिता सेवा, जल स्त्रोत, नॉन-रेव्हेन्यू वॉटर (NRW), अर्थात बिगर-महसुली पाण्याचा  अंदाज, सर्वोत्तम पद्धती आणि नवोन्मेष हे या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
  • या सर्वेक्षणाचे परिणाम युएलबी मधील जल सुरक्षेची स्थिती दर्शवेल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG)- 6 साध्य करायला मदत करेल.

गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने (एमओएचयुए) ने 15 डिसेंबर 2022 रोजी जमिनीवरील पेयजल सर्वेक्षण सुरु केले आहे. 500 अमृत शहरांमधील (एकत्रीकरणा नंतर 485) जल स्त्रोतांचे, गुणवत्ता, प्रमाण आणि पाणीपुरवठा, पाणी गळती आणि सांडपाणी  व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर आणि समार्धन यामधील शहराच्या सेवा पातळीच्या अनुपालनाचे मूल्यांकन करण्यासाठी, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजी, अमृत, अर्थात अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) 2.0 अंतर्गत पेय जल सर्वेक्षणाचा शुभारंभ केला होता. हे सर्वेक्षण अमृत मिशन साठी देखरेखीचे आणि त्याचा वेग वाढवण्याचे साधन ठरेल, तसेच ते शहरांमधील निकोप स्पर्धा वाढवेल. ये सर्वेक्षण करण्यासाठी मंत्रालयाने आयपीएसओएस (IPSOS) या त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली आहे.   

गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने (एमओएचयुए), या सर्वेक्षणात सहभागी होणार्‍या सर्व शहरी स्थानिक संस्थांसाठी (युएलबी) पेय जल टूलकिट आणि वेब पोर्टलवरील क्षमता विकास कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.   

जल उपयोगिता सेवा, वापरलेल्या पाण्याची उपयोगिता सेवा, जल स्त्रोत, नॉन-रेव्हेन्यू वॉटर (NRW), अर्थात बिगर-महसुली पाणी अंदाज, सर्वोत्तम पद्धती आणि नवोन्मेष या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याची प्रक्रिया पुढील प्रमाणे:  

  1. सेवा स्तरांचे स्वयं-मूल्यांकन: युएलबी, पुढील ऑन-लाइन पोर्टलवर दिलेल्या माप दंडाच्या आधारे स्वयं-मुल्यांकन करतील- l (https://peyjal-india.org/) .
  2. थेट निरीक्षण: जलशुद्धीकरण संयंत्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प/ फेकल स्लज ट्रीटमेंट प्लांट्स, जलस्रोत इत्यादींचे भू सर्वेक्षण करण्यासाठी मूल्यांकनकर्ते युएलबी ला भेट देतील आणि चाचणी आणि फोटोग्राफिक पुराव्यासाठी पाण्याचे नमुने गोळा करतील. हे युएलबी ने केलेल्या दाव्यांचे मूल्यांकन आणि प्रमाणीकरण करण्यासाठी उपयोगी ठरेल.
  3. नागरिकांचा अभिप्राय: युएलबी द्वारे वितरीत सेवांच्या समाधानाची पातळी मिळवण्यासाठी, मूल्यांकनकर्ते शहरांच्या सर्व भागांमधील नागरिकांचा अभिप्राय मिळवण्यासाठी सर्वेक्षण सर्वेक्षण करतील.

हे सर्वेक्षण घरोघरी पुरवण्यात आलेले पाण्याचे नळ आणि गटार जोडणी, नागरिकांना पुरवल्या जाणार्‍या पाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण, तक्रार निवारणाची तरतूद आणि जलस्रोतांचे आरोग्य यासारख्या अन्य माप दंडाची माहिती गोळा करेल. हे सर्वेक्षण, महसूल निर्मितीच्या तुलनेत पाणी आणि सांडपाणी सेवांवर होणारा खर्च या बाबतीत युएलबी च्या आर्थिक स्थिरतेच्या  स्थितीबाबतही अंदाज देईल. नागरिकांच्या दृष्टीकोनाच्या सर्वेक्षणा द्वारे, नागरिकांनी सुरु केलेली उत्तरदायित्व प्रणाली देखील प्रस्थापित होईल.  

शहरांसाठी गुण आणि शहर-पाणी अहवाल कार्ड चे आयोजन केले जाईल. यामधून प्रत्येक शहरामधील पाण्याची गुणवत्ता (आरोग्य) प्रकाशित केले जाईल. या सर्वेक्षणाचे परिणाम युएलबी मधील जल सुरक्षेची स्थिती दर्शवेल आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG)- 6 साध्य करायला उपयोगी ठरेल.    

 

 S.Thakur/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1885348) Visitor Counter : 202