कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय मंत्री डॉ.  जितेंद्र सिंह उद्या दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी सुशासन सप्ताह 2022, “प्रशासन गाव की ओर” या राष्ट्रव्यापी मोहिमेचे करणार उदघाटन

Posted On: 18 DEC 2022 6:47PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 5 दिवसांच्या प्रशासन गाव की ओर अभियानया मोहिमेचे उद्या उदघाटन होणार असून या दरम्यान देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांनी निवडलेल्या  3,120 नवीन सेवा ऑनलाइन सेवा वितरणासाठी सुरू केल्या जाणार आहेत.

दिनांक 10-18 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित सुशासन सप्ताह 2022 च्या पूर्वतयारीच्या टप्प्यात, जिल्हाधिकार्यांनी  सेवा वितरणासाठी  81,27,944 अर्ज निवडले  आहेत, तसेच राज्य तक्रार पोर्टलवर 19,48,122 सार्वजनिक तक्रारींचाही निपटारा करण्यात येणार आहे.

23 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय कार्यशाळांमधून 373 सर्वोत्तम सुशासन पद्धतींवर चर्चा होणार असल्याची,माहिती डीएआरपीजीचे सचिव  व्ही. श्रीनिवास यांनी दिली. ते म्हणाले, सुशासन सप्ताह-2022 दरम्यान सार्वजनिक तक्रारींमधील 43 यशोगाथा देखील सामायिक केल्या जातील.

भारतातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांतील सुशासन सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या असून त्यांचे सुयश चिंतले आहे.भारतातील सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी ही राष्ट्रव्यापी मोहीम आयोजित केली जाणार आहे.या मोहिमेत 700 हून अधिक जिल्हाधिकारी सहभागी होणार असून हे अधिकारी तहसील आणि पंचायत समितींच्या मुख्यालयांना भेट देणार आहेत.

डॉ.  जितेंद्र सिंह गुड गव्हर्नन्स वीक 2022 पोर्टल, www.pgportal.gov.in/GGW22 यांचे प्रकाशन ही करणार आहेत.हे एक समर्पित पोर्टल असून त्याद्वारे जिल्हाधिकारी सुशासनाच्या पद्धती आणि त्यांची प्रगती यांच्या व्हिडिओ क्लिपसही अपलोड करतील.

2022 मध्ये सार्वजनिक तक्रारी निवारणात राष्ट्राने केलेल्या  प्रगतीचे दर्शन घडविण्यासाठी  CPGRAMS  2022  चा वार्षिक अहवालही यावेळी प्रसिद्ध केला जाईल.

***

S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1884598) Visitor Counter : 142