गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी भूषवले कोलकाता इथे झालेल्या 25 व्या पूर्वीय क्षेत्र परीषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशाच्या पूर्व भागातल्या राज्यांमधल्या पायाभूत सुविधा विकसित व्हाव्यात या दिशेने, गेल्या काही वर्षांमध्ये बरेच काम केले
देशाच्या अमृतकाळातल्या आगामी 25 वर्षांच्या वाटचालीत, देशाच्या विकासात पूर्वेकडील हा भाग महत्त्वाची भूमिका बजावेल
Posted On:
17 DEC 2022 7:30PM by PIB Mumbai
कोलकाता इथे आज पूर्वीय क्षेत्र परीषदेची 25वी बैठक झाली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला पश्चिम बंगाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री, बिहारचे उपमुख्यमंत्री तसेच ओदिशा सरकारमधील मंत्री आणि गृह मंत्रालय तसेच परिषदेअंतर्गत येणाऱ्या राज्यांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीच्या उद्घाटन पर भाषणात गृहमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 8 वर्षांमध्ये झालेल्या विभागीय परिषदांच्या बैठकांमध्ये, 1000 पेक्षा जास्त मुद्द्यांवर चर्चा झाली. यांपैकी आजपर्यंत सुमारे 93 टक्के मुद्द्यांवर तोडगा निघाला आहे, आणि हे मोठं यश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशाच्या पूर्व भागातल्या राज्यांमधल्या पायाभूत सुविधा विकसित व्हाव्यात या दिशेने, गेल्या काही वर्षांमध्ये बरेच काम केले आहे, असे अमित शहा यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पूर्वेकडील राज्यांच्या विकासावर भर दिला आहे, आणि त्यामुळेच त्यांनी मांडलेल्या गति शक्ती योजनेच्या संकल्पनेत पूर्वेकडील राज्यांना मोठे स्थान मिळाले आहे असे शहा यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतकाळातल्या आगामी 25 वर्षांच्या वाटचालीत, देशाच्या विकासात पूर्वेकडील हा भाग महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
अंमली पदार्थांविरोधातील देशाचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून, कृत्रीम बुद्धीमत्तेच्या मदतीने अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देण्याची गरज शहा यांनी यावेळी अधोरेखीत केली.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884460)
Visitor Counter : 233