युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे राष्ट्रीय राजधानीत अनावरण


विश्वचषक ट्रॉफी भारतातील विविध शहरांमध्ये नेल्यामुळे पुरुष संघाच्या हॉकी विश्वचषक 2023 भुवनेश्वर - रुरकेलाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल : अनुराग ठाकूर

Posted On: 16 DEC 2022 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022

FIH ओदिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 भुवनेश्वर - रुरकेलाची ट्रॉफी टूर आज नवी दिल्ली येथे पोहचली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी हॉकी चाहत्यांच्या उपस्थितीत  ट्रॉफीचे अनावरण केले. या कार्यक्रमाला 1975 विश्वचषक स्पर्धेचे विजेते अजित पाल सिंग, अशोक ध्यानचंद, ब्रिगेडियर एच जे एस  चिमनी, आणि माजी ऑलिंपियन हरबिंदर सिंग, पद्मश्री जाफर इक्बाल आणि विनित कुमार (उपाध्यक्ष, दिल्ली हॉकी) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी  अनुराग सिंह  ठाकूर म्हणाले, विश्वचषक ट्रॉफी भारतातील विविध शहरांमध्ये घेऊन जाणे हा FIH ओदिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 भुवनेश्वर - रुरकेलाला प्रोत्साहन देण्याचा एक चांगला मार्ग आहे. ही ट्रॉफी ओदिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब असा प्रवास करत आता दिग्गज  हॉकीपटू आणि चाहत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे पोहचली आहे आणि या स्पर्धेबद्दल जागरुकता वाढवण्याचा हा  उत्तम मार्ग आहे.

ठाकूर पुढे म्हणाले, ऑलिंपिक खालोखाल  विश्वचषक ही क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि आम्ही FIH ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 भुवनेश्वर - रुरकेला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहोत. यजमान शहरांमधील चाहते स्टेडियम वर येतीलच , मात्र ट्रॉफी विविध राज्यांमध्ये फिरल्यामुळे त्या-त्या  राज्यांतील चाहत्यांनाही टीव्हीवर ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

ट्रॉफी टूर बद्दल:

प्रतिष्ठित FIH ओदिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 भुवनेश्वर - रुरकेला  इथे 13 जानेवारी 2023 पासून सुरू होत असून ही प्रतिष्ठित ट्रॉफी 13 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात फिरून 25 डिसेंबर रोजी ओदिशात दाखल होईल.   29 जानेवारी 2023 रोजी विजेत्या संघाकडून  ट्रॉफी उंचावली जाण्यापूर्वी  चाहत्यांना आणि जनतेला अशा प्रकारे या ट्रॉफीशी जोडले जाण्याची  संधी मिळत आहे. . ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते 5 डिसेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये या देशव्यापी ट्रॉफी टूरचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर  पश्चिम बंगाल, मणिपूर, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमधून ट्रॉफीचा  आहे.

अधिक छायाचित्रांसाठी, हॉकी इंडिया फोटो लायब्ररीमध्ये लॉग इन करा:

क्लिक करा: https://photolibrary.hockeyindia.org/

विश्वचषकाकरिता तिकिटांची आगाऊ नोंदणी करण्यासाठी :  https://insider.in/online, अधिक माहितीसाठी संपर्क करा : help@insider.in

 

S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1884304) Visitor Counter : 137