रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारत (बीएच) मालिका नोंदणी चिन्ह विषयक नियमांमध्ये सुधारणा सूचित करण्यासाठी अधिसूचना जारी

Posted On: 16 DEC 2022 9:50AM by PIB Mumbai

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारत (बीएच) मालिका  नोंदणी चिन्ह संबंधी  नियमांमध्ये सुधारणा सूचित करण्यासाठी 14 डिसेंबर 2022 रोजी  जी एस आर 879(ई)  अधिसूचना जारी केली आहे . रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी जी एस आर 594(ई) द्वारे बीएच मालिका नोंदणी चिन्ह सुरु  केले होते.  या नियमांच्या अंमलबजावणीदरम्यान, बीएच मालिका व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत.

बीएच मालिका  अंमलबजावणीची व्याप्ती वाढवण्याच्या तसेच त्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने ,रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुढील प्रमुख वैशिष्ट्यांसह नवीन नियम प्रस्तावित केले आहेत:

1. बीएच मालिका नोंदणी चिन्ह असलेल्या वाहनांची मालकी इतर व्यक्तींना हस्तांतरित करणे, जे बीएच मालिकेसाठी पात्र किंवा अपात्र आहेत.

2. सध्या नियमित नोंदणी चिन्ह असलेली वाहने देखील आवश्यक कर भरून बीएच मालिका नोंदणी चिन्हात  रूपांतरित केली जाऊ शकतात, जेणेकरून  ते बीएच मालिका नोंदणी चिन्हासाठी पात्र ठरतील

3. नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी, नियम 48 मध्ये दुरुस्ती करून त्यात निवासस्थान किंवा कामाच्या ठिकाणी बीएच मालिकेसाठी  अर्ज सादर करण्याची लवचिकता प्रस्तावित केली  आहे.

4.  गैरवापर टाळण्यासाठी खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी नोकरीचे   प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे.

5. अधिकृत ओळखपत्राव्यतिरिक्त, सरकारी कर्मचारी आता त्यांच्या सेवा प्रमाणपत्राच्या आधारे बीएच मालिका नोंदणी चिन्ह देखील मिळवू शकतात.

राजपत्रित  अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

***

Nilima C/Sushama K/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1884004) Visitor Counter : 192