अंतराळ विभाग

इस्रोने आपल्या व्यावसायिक शाखेद्वारे गेल्या पाच वर्षांत 19 देशांचे 177 परदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केल्याची केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र यांनी दिली माहिती

Posted On: 15 DEC 2022 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2022

 

इस्रोने आपल्या व्यावसायिक शाखेद्वारे गेल्या पाच वर्षांत 19 देशांचे 177 परदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);  पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली.

राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत इस्रोने ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड्स, रिपब्लिक ऑफ कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, इंग्लड आणि अमेरिका या देशांचे 177 परदेशी उपग्रह पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही-एमकेआयआयआय प्रक्षेपकांनी व्यावसायिक करारांतर्गत यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत. 

जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत या 177 परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून सुमारे 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 46 दशलक्ष युरोचे परदेशी चलन प्राप्त झाल्याची माहितीही डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली. 

याशिवाय, अवकाश उपक्रमांबाबत गैर सरकारी संस्थाना प्रोत्साहन देण्याकरता तसेच त्यांच्या हाताळणीसाठी इन-स्पेस ही एक खिडकी व्यवस्था उभारल्याने याबाबत स्टार्टअप्स क्षेत्रात लक्षणीय रस दिसून आला. परिणामी, इन-स्पेस डिजिटल मंचावर आतापर्यंत 111 अवकाश स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे. 

 

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883728) Visitor Counter : 217