इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

जी-20 विकास कार्यगटाच्या बैठकीनिमित्त आयोजित परिषदेला राजीव चंद्रशेखर यांनी केले संबोधित, विकासासाठी डेटाचे महत्त्व केले अधोरेखित


डेटा प्रशासन आराखडा धोरणा अंतर्गत, मोठ्या स्वरूपात अनोंमाइज्ड डेटा संचाचे एकत्रीकरण, संकलन आणि संयोजन भारत लवकरच सुरु करेल : राजीव चंद्रशेखर

आपण विश्वास आणि संरक्षणाच्या एकत्रित दृष्टीद्वारे डिजिटल अर्थव्यवस्थेकडे पाहिले पाहिजे : राजीव चंद्रशेखर

Posted On: 13 DEC 2022 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2022

 

राष्ट्रीय डेटा प्रशासन आराखडा धोरणाअंतर्गत, भारत सरकार लवकरच एकसमान आणि संयोजित अनोंमाइज्ड डेटा संचाचे संकलन लवकरच सुरु करेल, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

जी-20 शिखर परिषदेअंतर्गत, आज मुंबईत झालेल्या  विकास कामांशी संबंधित कार्यगटाच्या परिषदेला त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. विकासासाठी डेटा  या संकल्पनेवर  ही परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताने जी -20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जी -20 विकास कार्य गटाची ही पहिली अधिकृत बैठक आहे.

भारतात एक सचेत  स्टार्ट-अप परिसंस्था आणि बळकट  कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था आहे. त्यामुळे कंपन्यांनी त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स प्रशिक्षित करण्यासाठी  या मोठ्या डेटाबेसचा अधिकाधिक वापर करावा, अशी आमची अपेक्षा आहे. "नवोन्मेषला चालना देण्याचे तसेच अधिक प्रभावी धोरण आणि व्यावहारिक उपाय तयार करण्याचे आमचे ध्येय आहे," असे त्यांनी सांगितले.

अनुकूल विकासासाठी  डिजिटल डेटा आणि डेटा आधारित हस्तक्षेपांचे महत्त्व राजीव चंद्रशेखर यांनी अधोरेखित केले. डेटाच्या दुरुपयोगाविरूद्ध आवश्यक सुरक्षा उपायांची आवश्यकता अधोरेखित करून यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार करत असल्याचे ते म्हणाले. ''आपण विश्वास आणि संरक्षणाच्या एकत्रित दृष्टीद्वारे  डिजिटल अर्थव्यवस्थेकडे पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान, डिजिटल इंटरनेट आणि खऱ्या  डेटासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक आराखडा तयार करण्यासाठी आपण  लोकांसाठी चांगल्या आणि शाश्वत विकासाला मुख्य प्रवाहात आणणारे काम एकत्रितपणे  केले पाहिजे'', असे ते म्हणाले.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे डेटा संचाचा  वापर दूरगामी परिणाम करेल आणि तळागाळातील विकास कामांना याचा फायदा होऊन डिजिटायझेशनचा विस्तार होईल, ते असे त्यांनी सांगितले.

दूरगामी  विकासासाठी विकसित आणि विकसनशील देशांनी  एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. एकीकडे डेटा सार्वभौमत्व आणि संरक्षण आणि दुसरीकडे जागतिक समुदायाला लाभदायक ठरू शकणार्‍या डेटा कॉमन्सची संकल्पना यामध्ये योग्य संतुलन शोधणे महत्त्वाचे आहे, असे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

 

* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1883218) Visitor Counter : 139