कृषी मंत्रालय
शाश्वत शेतीसाठी मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान वचनबद्ध: नरेंद्र सिंह तोमर
देशभरातील शेतकऱ्यांना 22 कोटी मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप: केंद्रीय कृषिमंत्री
Posted On:
05 DEC 2022 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2022
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज 'शाश्वत शेतीसाठी मृदा आरोग्य व्यवस्थापन' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. रासायनिक शेती आणि इतर कारणांमुळे मातीची सुपीकता कमी होऊ लागते आणि हवामान बदल ही केवळ भारतापुढीलच नव्हे तर संपूर्ण जगासमोर असलेली फार मोठी समस्या ठरत आहे, असे तोमर यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवामान बदल या समस्येची चिंता असून ते वेळोवेळी त्यावर उपाययोजना आखतात आणि त्यावर निरंतर कार्य करतात. शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी पंतप्रधान वचनबद्ध आहेत, असे तोमर यांनी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जागतिक मृदा दिनानिमित्त, नीती आयोग आणि जर्मनीच्या फेडरल आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्रालयाशी (BMZ) शी संलग्न जीआयझेडच्या सहकार्याने, आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोमर बोलत होते. जमिनीत सेंद्रिय कार्बनची कमतरता ही आपल्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. हे गंभीर आव्हान पेलण्यासाठी आणि जमिनीच्या सुपीकतेसाठी आपल्याला नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे लागेल, जे पर्यावरणासाठी फायदेशीर आहे, असे तोमर म्हणाले. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यांसोबत काम करत आहे.. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 1,584 कोटी रुपये किमतीच्या , राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला एक स्वतंत्र योजना म्हणून मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार मृदा आरोग्य कार्डच्या माध्यमातूनही काम करत असून देशभरातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यात 22 कोटींहून अधिक मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आली आहेत. मृदा आरोग्य व्यवस्थापन योजनेंतर्गत सरकार पायाभूत सुविधांचा विकास देखील करत आहे, यामध्ये विविध प्रकारच्या माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याची तरतूद आहे, असे तोमर म्हणाले.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1880974)
Visitor Counter : 262