माहिती आणि प्रसारण मंत्रालय
युवक हे भारताच्या विकासाचे इंजिन आहेत तर भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन - केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते हिसार येथे कम्युनिटी रेडिओ स्टेशन 90.0 'भव्यवाणी' चे उद्घाटन
Posted On:
04 DEC 2022 6:11PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी युवकांना क्रियाशील आणि नवोन्मेषी बनण्याचे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मजबूत जाळे निर्माण करण्याचे तसेच स्वतःचा कौशल्य विकास करून देशाच्या विकासाचे इंजिन बनण्याचे आवाहन केले. भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन आहे असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून बहुविद्याशाखीय दृष्टीकोनाद्वारे सर्वांगीण शिक्षण घेण्यावर त्यांनी भर दिला. शिक्षण हा देशाच्या आणि जनतेच्या विकासाचा कणा असून प्रतिभावान युवक ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने आपल्या कुटुंबाची, देशाची आणि देशवासीयांची सेवाही करते.
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्ट-अप देश आहे असे ते म्हणाले.
ओम स्टर्लिंग ग्लोबल युनिव्हर्सिटी, हिसार येथे दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अनुराग सिंह ठाकूर आज बोलत होते. त्यांनी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना क्रीडा विषयक पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याचे आवाहन केले . त्याचबरोबर युवकांना तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ' फिटनेस का डोस, आधार घंटा रोज' वर भर देत फिट इंडिया चळवळीत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. जी -20 गटाचे अध्यक्षपद आता भारताकडे असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचा एक भाग म्हणून एक युवा परिषद देखील होणार आहे.
हरियाणातील शेतकरी, खेळाडू, मुलींनी आपापल्या क्षेत्रात राज्याचा आणि देशाचा गौरव वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
विद्यापीठाच्या पहिल्याच दीक्षांत समारंभात आज पदवीधर झालेल्या व पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे आणि विद्यापीठाचेही त्यांनी अभिनंदन केले. अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, देशात 750 ‘युवा संवाद’ चे आयोजन केले जात आहे.
दीक्षांत समारंभात 815 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका ; 15 पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या 184 विद्यार्थ्यांना आणि 59 पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 426 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय 14 पदविका अभ्यासक्रमातील 178 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. विविध विभागातील 3 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके आणि 8 विद्यार्थ्यांना अभ्यासातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले.
अनुराग सिंह ठाकूर यांनी हिसार येथील ओम स्टर्लिंग ग्लोबल युनिव्हर्सिटीतील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागामध्ये स्थापन केलेल्या 'भव्यवाणी' या कम्युनिटी रेडिओ स्टेशन 90.0 चे उद्घाटन केले. या केंद्राने या कार्यक्रमातील केंद्रीय मंत्र्यांचे भाषण देखील प्रसारित केले. हिसारचे लोकसभा खासदार ब्रिजेंद्र सिंह आणि हरियाणाचे शहरी स्थानिक विकास मंत्री डॉ. कमल गुप्ता आणि इतर मान्यवर देखील दीक्षांत समारंभाला उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांनी हिसार येथील दूरदर्शन केंद्र आणि आकाशवाणी केंद्रांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880818)
Visitor Counter : 194