माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आकाशवाणी 3 डिसेंबर 2022 रोजी प्रसारित करणार वार्षिक डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देणार व्याख्यान
आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून रात्री 9.30 पासून प्रसारण उपलब्ध
डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान रात्री 10.30 पासून दूरदर्शन न्यूजवर होणार प्रसारित
Posted On:
02 DEC 2022 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022
आकाशवाणी शनिवारी, 3 डिसेंबर 2022 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानाची वार्षिक आवृत्ती प्रसारित करेल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व्याख्यान देतील. हे व्याख्यान आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून शनिवार, 3 डिसेंबर 2022 रोजी रात्री 9.30 पासून प्रसारित होईल. याशिवाय, श्रोते 100.1एफएम गोल्ड,, 102.6 एफएम रेनबो, ऑल इंडिया रेडिओच्या वाहिन्या , Twitter वर @airnewsalerts ट्विटर हॅंडलवर, NewsOnAirOfficial यु ट्युब वाहीनीवरुन तसेच NewsOnAir ॲपवर देखील हे प्रसारण ऐकू शकतात.
दूरदर्शन न्यूज वाहिनीवरुन त्याच दिवशी रात्री 10.30 पासून डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान प्रसारित केले जाईल.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अनुषंगाने या वर्षीच्या व्याख्यानाची संकल्पना "अमृत काळात भारतीयता" अशी आहे.
डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानाविषयी :
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानाचे आयोजन आकाशवाणी द्वारे केले जाते. साधेपणाचे प्रतीक असणारे डॉ. राजेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध विद्वान, संविधान सभेचे अध्यक्ष आणि महान द्रष्टे होते. भारत आणि भारतीयत्व यांना त्यांनी सदैव सर्वोच्च स्थान दिले होते.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, 1969 पासून सुरू झालेली आकाशवाणीची ही व्याख्यानमाला एक सन्माननीय परंपरा आहे. या व्याख्यानमालेत आजवर माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासह भारतीय साहित्यातील दिग्गज हजारी प्रसाद द्विवेदी, महादेवी वर्मा, हरिवंशराय बच्चन यासारख्या प्रभृतींनी भारताची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि त्याची प्रगती या विस्तृत विषयांवर हे प्रतिष्ठित स्मृती व्याख्यान दिले आहे.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 3 डिसेंबर रोजी व्याख्यानाचे ध्वनीमुद्रण आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केले जाते. व्याख्यानमालेत देशाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला जातो. या व्याख्यानांतून देशाची कामगिरी आणि भविष्यातील शक्यतांचे समीक्षकीय विश्लेषणही केले जाते.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880513)
Visitor Counter : 241