रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेला प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात 76 टक्क्याची वाढ
रेल्वेला आरक्षित प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात 50% टक्क्याची तर अनारक्षित प्रवासी सेवेतून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात 422% टक्क्याची वाढ
Posted On:
02 DEC 2022 4:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022
एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत भारतीय रेल्वेचं एकूण अंदाजीत उत्पन्न 43,324 कोटी रुपये होतं, मागच्या वर्षीच्या याच कालावधीतल्या 24,631 कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यात 76 टक्क्याने वाढ झाली आहे.
आरक्षित प्रवासी विभागात, 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सुमारे 5,365 लाख प्रवाशांनी आरक्षण सेवेचा लाभ घेतला. मागच्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 4, 860 लाख इतकी होती. यंदा त्यात 10% नं वाढ झाली. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत प्रवासी आरक्षणातून रेल्वेला मिळालेलं महसूली उत्पन्न 34,303 कोटी रुपये इतकं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत प्रवासी आरक्षणातून रेल्वेला मिळालेलं महसूली उत्पन्न 22, 904 कोटी रुपये होतं, त्यात यावर्षी 50% इतकी वाढ झाली.
1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सुमारे 35,273 लाख इतक्या प्रवाशांनी रेल्वेच्या अनारक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेतला. मागच्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 13, 813 लाख होती. यात यावर्षी तब्बल 155% इतकी वाढ झाली. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत रेल्वेला अनारक्षित प्रवासी सेवेतून 9,021 कोटी रुपयांचं महसुली उत्पन्न मिळालं. मागच्या वर्षीच्या याच कालावधीत ते 1,728 कोटी रुपये इतकं होतं. यात यंदा 422% ची वाढ झाली.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1880471)