माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रत्येकजण मनापासून चित्रपट निर्माता असतो ही 'सिनेमा बंदी'ची मध्यवर्ती संकल्पना आहे
हा चित्रपट स्वतंत्र सिनेमाला मनापासून दिलेली मानवंदना आहे: राजेश निदिमोरू
गोवा/मुंबई, 28 नोव्हेंबर 2022
भारतीय सिनेमातील अनोख्या संकल्पना आणि कथानकाच्या स्पर्धेत पुढे वाटचाल करत दिग्दर्शक प्रवीण कंदरेगुला यांचा ‘सिनेमा बंदी’ हा विनोदी नाट्यमय चित्रपट तुम्हाला रिक्षा चालक ते सिनेमावाला पर्यंतच्या प्रवासाच्या हृदयस्पर्शी कथेशी बांधून ठेवेल.
'या चित्रपटाचा प्रत्येक पैलू नवा आहे, अगदी पटकथा लिहिण्यापासून ते निर्मात्याकडे कल्पना मांडण्यापर्यंत, त्यानंतर कलाकार आणि चित्रीकरण स्थळे शोधण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट नवी आहे असे 'सिनेमा बंदी' चे निर्माते राजेश निदिमोरु यांनी 53 व्या इफ्फीमध्ये पत्र सूचना कार्यालयाने आज आयोजित केलेल्या इफ्फी टेबल टॉक्स सत्राला संबोधित करताना सांगितले.

एक विनोदी , वास्तवात खोलवर रुतलेला , नेटफिल्क्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट मागील दोन आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. निर्माते राजेश निदिमोरू यांनी स्पष्ट केले की योग्य स्टुडिओ आणि ज्ञात कलाकारांशिवाय हा चित्रपट करण्याचे एकमेव कारण त्याची अस्सल कथा आणि अभिनय हे आहे. . ‘चित्रपट हा मनापासून बनवलेला हा चित्रपट स्वतंत्र सिनेमाला दिलेली मानवंदना आहे. मला माझ्या करिअरची स्वतंत्र सुरुवात पुन्हा करायची होती आणि ती पहिली भावना पुन्हा अनुभवायची होती', असे ते म्हणले. हा चित्रपट खरे तर एक बऱ्यापैकी मनोरंजक चित्रपट बनला असता परंतु ताजेपणा आणि खरेपणा यामुळेच तो अद्वितीय बनला आहे, असे त्यांनी सांगितले. राजेश निदिमोरू यांनी अधोरेखित केले की इफ्फी हा मंच चित्रपट निर्मात्यांना इतर चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट व्यासपीठ आहे.

प्रत्येकजण मनापासून चित्रपट निर्माता असतो आणि कोणीही इच्छा असल्यास चित्रपट बनवू शकतो, असे या चित्रपटातून सांगण्याचा निर्मात्याने प्रयत्न केला आहे. ‘माझ्या वडिलांनी मला कॅमेरा दिला होता, तेव्हा माझ्या लहानपणापासून वैयक्तिक प्रेरणा घेऊन मला तो वापरायचा होता. त्यानंतर हा चित्रपट बनवण्याची कल्पना मला सुचली,’ असे दिग्दर्शक प्रवीण कंद्रेगुला यांनी सांगितले. या चित्रपटातील कलाकारांनी अभिनय केला नाही तर ते स्वतः ते पात्र जगले आहेत . खरी अभिव्यक्ती मिळवण्यासाठी, आम्ही कॅमेरा सेटअप लपवला, असेही ते म्हणाले.
पात्रांचे गावामधील चित्रण प्रेक्षकांना हसायला लावेल. चित्रपटाचे चित्रीकरण कर्नाटकातील मुलबगल तालुक्याच्या गावी झाले आहे. याबाबत पटकथा लेखक वसंत मरिंगंती म्हणाले की, या गावात केवळ 20-25 घरे आहेत आणि ती विखुरलेली आणि स्वच्छ होती, जे आमच्यासाठी एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखे होते. आमच्या चित्रीकरणासाठी वातावरण अतिशय आरामदायक होते आणि कथेसाठी योग्य होते.

सारांश:
गावातील एक गरीब आणि धडपड्या रिक्षा चालक वीराबाबूला त्याच्या ऑटोरिक्षामध्ये मागे राहिलेला महागडा कॅमेरा दिसतो. गावातील एकमेव वेडिंग फोटोग्राफर गणपती त्याला सांगतो की सुपरस्टार्सचे ब्लॉकबस्टर सिनेमे बनवण्यासाठी हाच कॅमेरा वापरला जातो. उत्साही वीरबाबू ‘सुपरस्टार’ कॅमेरा, घेऊन एक ब्लॉकबस्टर चित्रपट बनवण्याचे ठरवतो आणि संपूर्ण गावाला त्याच्या चित्रपटात काम करायला सांगतो. अशा प्रकारे रिक्षाचालक ते सिनेमावाला असा त्याचा प्रवास सुरू होतो.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879654)
Visitor Counter : 260