भारतीय निवडणूक आयोग
अरुण गोयल यांनी नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला
Posted On:
21 NOV 2022 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2022
अरुण गोयल यांनी आज भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
सध्या नेपाळमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून काम पाहत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्तिशः अरुण गोयल यांना फोन करून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले. निवडणूक आयोगामध्ये त्यांचे स्वागत करताना कुमार म्हणाले की, गोयल यांचा अफाट आणि वैविध्यपूर्ण प्रशासकीय अनुभव निवडणूक प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक, सुगम्य आणि सर्वांना सहभागी करून घेण्याच्या आयोगाच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल.
अरुण गोयल,आयएएस (पंजाब केडर - 1985 तुकडी )
- इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठाच्या चर्चिल महाविद्यालयामधून विकास अर्थशास्त्रात डिस्टिंक्शनसह पदव्युत्तर पदवी
- एम.एस्सी. गणित
भारत सरकारच्या सेवेतील नेमणुका
- सचिव, अवजड उद्योग मंत्रालय 2020 – 2022
(भारतातील ई-वाहन चळवळ महत्वपूर्ण वळणावर आणली)
- सचिव, सांस्कृतिक मंत्रालय 2018 - 2019
- एएस आणि एफए , कामगार आणि रोजगार मंत्रालय 2017
- उपाध्यक्ष, दिल्ली विकास प्राधिकरण 2015 - 2016
- सहसचिव, वित्त मंत्रालय, महसूल विभाग 2012 - 2014
- सहसचिव, शहरी विकास मंत्रालय 2011
पंजाब सरकारमध्ये नेमणुका
- प्रधान सचिव (ऊर्जा आणि पाटबंधारे) 2010
- प्रधान सचिव (गृहनिर्माण आणि शहरी विकास) 2007 - 2009
- सचिव, व्यय विभाग 2006
- व्यवस्थापकीय संचालक, पंजाब उद्योग आणि निर्यात 2003 - 2005
महामंडळ
- व्यवस्थापकीय संचालक, पंजाब वेअरहाऊसिंग महामंडळ 2001 - 2002
- जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हाधिकारी, लुधियाना 1995 - 2000
- व्यवस्थापकीय संचालक, चंदीगड औद्योगिक आणि पर्यटन विकास महामंडळ 1994
- जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हाधिकारी, भटिंडा 1993
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877708)
Visitor Counter : 1233