माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची इफ्फी 53 च्या उद्घाटन सत्रातील अल्मा अँड ऑस्कर चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरला हजेरी

गोवा/मुंबई, 20 नोव्‍हेंबर 2022

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा  मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन आणि  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा आज गोव्यामध्ये पणजी इथल्या INOX चित्रपट गृहात अल्मा अँड ऑस्कर चित्रपटाच्या भव्य स्क्रीनिंगला चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांसह उपस्थित होते.

यावेळी मंत्री म्हणाले की, वर्षागणिक हा महोत्सव आणखी मोठा होत आहे. या वर्षी महोत्सवात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांची संख्या जास्त आहे. यंदाच्या इफ्फी महोत्सवात 79 पेक्षा जास्त देशांचे 280 चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामधून आपण आजवर केलेल्या कामाचा आवाका लक्षात येतो, ते पुढे म्हणाले.   

अनुराग सिंह ठाकूर यांनी नमूद केले की यंदा पहिल्यांदाच इफ्फी च्या प्रमुख उद्घाटन समारंभाच्या आधी उद्घाटनपर चित्रपट दाखवला जात आहे.

इफ्फीने सर्वत्र निर्माण केलेल्या आनंददायी आणि उत्सवी वातावरणाबद्दल बोलताना डॉ. एल. मुरुगन म्हणाले की, इफ्फी जगाला जोडत आहे. या महोत्सवात जगभरातील चित्रपट क्षेत्राचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. इफ्फी आपली भारतीय संस्कृती जगभर घेऊनही जात आहे, ते म्हणाले.  

अल्मा अँड ऑस्कर या उत्कट प्रेमकथेबद्दल आपले विचार मांडताना दिग्दर्शक डायटर बर्नर यांनी, हा चित्रपट अल्मा महलर या प्रसिद्ध व्हिएनीज स्त्रीबद्दल असल्याचे अधोरेखित केले.

उत्कट प्रेमकथेबद्दल अंतर्दृष्टी देऊन दिग्दर्शक डायटर बर्नर  म्हणाले की, अल्मा महलर सुंदर आणि धैर्यवान होती आणि तिने सामाजिक सामाजिक रूढी-परंपरांना आव्हान दिले होते, तर ऑस्कर कोकोस्का हा एक सिद्ध-हस्त नाटककार आणि अभिव्यक्तीवादी चित्रकार होता. त्यांच्यातील प्रेमाने दोघांना आत्मनाशाच्या उंबरठ्यावर आणले आणि त्याच्या खुणा कलेच्या इतिहासात मागे सोडल्या.

 

इफ्फी 53 च्या उद्घाटन सत्रातील चित्रपट अल्मा अँड ऑस्कर च्या रेड कार्पेट समारंभाची क्षणचित्रे  

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि केंद्रीय राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन यांचे इफ्फी 53 च्या उद्घाटन सत्रातील अल्मा अँड ऑस्कर’ चित्रपटाच्या रेड कार्पेट समारंभामध्ये आगमन

 

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि केंद्रीय राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन ‘अल्मा अँड ऑस्कर’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांच्या बरोबर  

 

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर ऑस्ट्रियन चित्रपट ‘अल्मा अँड ऑस्कर’चे दिग्दर्शक डायटर बर्नर यांचा सत्कार करताना

 

IFFI 53 मध्ये ‘अल्मा अँड ऑस्कर’ चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि वर्ल्ड प्रीमियरमध्ये, चित्रपटाची टीम आणि मान्यवर


* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1877576) Visitor Counter : 244