माहिती आणि प्रसारण मंत्रालय

53 व्या इफ्फीत सहभागी होणाऱ्या सर्वांना मिळणार अनोखा सिनेअनुभव - राष्ट्रपती

Posted On: 18 NOV 2022 5:35PM by PIB Mumbai

 

#IFFIWood, November 18, 2022

53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फी यशस्वी व्हावा यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवांपैकी इफ्फी एक असून याचे आयोजक आणि सहभागींना त्यांनी  शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय संबंधांना चालना देण्यासाठी इफ्फीचे योगदानही राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. सहभागाच्या दृष्टीने हा महोत्सव दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करत आहे. चित्रपट निर्माते, कलाकार, सिनेउद्योग व्यावसायिक आणि चित्रपट रसिकांना, विचारांची आणि समृद्ध अनुभवांची देवाणघेवाण करण्यास हा महोत्सव संधी उपलब्ध करतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

चित्रपट हे सृजनशीलता आणि मनोरंजनाचे मोलाचे माध्यम असल्याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले. चित्रपट हे विलक्षण दृश्यमानता, ध्वनी आणि कथनाचे अलौकीक तंत्र याचे माध्यम असल्याचे सांगत, 53 व्या इफ्फीत सहभागी होणाऱ्या सर्वांना नक्कीच अनोखा सिनेअनुभव मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश खाली पहा.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877062) Visitor Counter : 165