रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नितीन गडकरी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी येथे, 1206 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग (एनएच) प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
Posted On:
17 NOV 2022 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी येथे, 1206 कोटी रुपयांच्या 3 राष्ट्रीय महामार्ग (एनएच) प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी खासदार राजू बिश्त, जयंत कुमार रॉय, केंद्रीय आणि राज्यातील अधिकारी उपस्थित होते.
आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग एनएच-31 (उडलाबारी) वर 615.5 किमीवरील लेव्हल क्रॉसिंगच्या जागी दुपदरी पुलाचा समावेश केला आहे त्या पुलामुळे आणि राष्ट्रीय महामार्ग एनएच-31 (मायनागुरी) वरील 661.100 किमीच्या लेव्हल क्रॉसिंगच्या ऐवजी बांधल्या जाणाऱ्या पुलामुळे आंतरराष्ट्रीय संपर्काला लक्षणीय चालना मिळेल, असे गडकरी यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे येथील अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि त्याबरोबरच प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे पश्चिम बंगाल आणि देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल आणि कृषी क्षेत्राकडे लक्षणीय वाटचाल होईल, असे गडकरी म्हणाले.
सिलीगुडीतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून , आज राष्ट्रीय महामार्ग एनएच-31 (नवीन एनएच-10) च्या चौपदरी / सहापदरीकरणासाठी 569.258 किमी ते 581.030 किमी (शिवमंदिर ते सेवोके आर्मी कॅन्टोन्मेंट जवळ एनएच- 31 वर एएच -02 प्रकल्पाच्या शेवटी) दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांच्या विकासासाठी पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे ईशान्य भारताचा नेपाळ, भूतान आणि बांगलादेश सारख्या शेजारील देशांशी संपर्क वाढेल.
S.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876790)
Visitor Counter : 199