माहिती आणि प्रसारण मंत्रालय
तुमच्यासाठी सादर करीत आहोत बहुरंगी 53 व्या इफ्फी महोत्सवाचे अधिकृत माहितीपत्रक
#IFFIWood, November 17, 2022
जपानी लेखक हारुकी मुराकामी म्हणतात, “जर तुम्ही इतर सर्वजण वाचत असलेलीच फक्त पुस्तके वाचत असाल, तर तुम्ही फक्त त्यांच्यासारखा, तसाच म्हणजे इतर सर्वजण करत आहेत तसा विचार करू शकता”. आपण इफ्फीच्या सिनेउत्सवाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झालो आहोत, मग ही अशी वेळ आहे , आपण स्वतःला सांगायला हवे की, आपण फक्त इतर पाहत असलेले चित्रपट पाहिले तर, इतर सर्व करत असलेले विचार, जगणे आणि अनुभवच आपल्यालाही येतील का?
होय, आम्हाला विश्वास आहे की, चित्रपट महोत्सवांना विशेष अगदी खास बनवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे कलात्मक प्रतिभेचा एक आकर्षक संग्रह
ते आपल्यासाठी सादर करतात. यंदाच्या 53 व्या इफ्फीमधे, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटातील जे जे सर्वोत्कृष्ट आहे ते भारतीय आणि परदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे एक स्पष्ट उद्दिष्ट आहे.
तर, आपण चित्रपटांच्या उत्सवाला सुरुवात करत असताना, आम्ही तुमच्यासाठी बहुरंगी महोत्सव सादर करत आहोत. यासाठीच, भारतीय चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या माहितीपत्रकावर एक नजर टाकली पाहिजे.
53 व्या इफ्फीतील भारतीय चित्रपटांची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आणि 53 व्या इफ्फीतील आंतरराष्ट्रीय चित्रपटांची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आम्हाला आशा आहे की, गोव्यातील इफ्फीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना अधिक सुंदर चित्रपट निवडण्यात या माहितीपत्रकामुळे मदत होईल, पर्यायाने उत्सवाने प्रेरित होण्याच्या तुमच्या आकांक्षांवर आधारित तुमच्या उत्सवाची योजना आखण्यात सहाय्य होईल.
आणि जर तुम्ही गोव्यातील उत्सवाला व्यक्तिशः उपस्थित राहू शकणार नसाल तर, आम्हाला आशा आहे की, या निमंत्रणामुळे तुम्हाला शरीराने नाही तरी किमान मनाने, अंत:करणाने आणि आत्म्याने उपस्थित राहण्याची प्रेरणा मिळेल.
S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1876752)
Visitor Counter : 230