भारतीय निवडणूक आयोग
नेपाळ मधील आगामी निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आमंत्रण
प्रविष्टि तिथि:
17 NOV 2022 2:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नेपाळमधील आगामी प्रतिनिधीगृह आणि प्रांतीय विधानसभेच्या निवडणुकांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणून आमंत्रित केले आहे. नेपाळच्या 275 सदस्यांच्या प्रतिनिधीगृह निवडणुकीसाठी आणि सात प्रांतीय विधानसभांच्या 550 जागांसाठी येत्या 20 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे.
राजीव कुमार, 18 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2022 दरम्यान नेपाळमध्ये राष्ट्रीय अतिथी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करतील. या दौऱ्यात ते काठमांडू आणि जवळच्या परिसरातील मतदारसंघांना भेट देतील. भारतीय निवडणूक आयोग देखील अशाच प्रकारचा आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम राबवत असते, ज्यामध्ये इतर निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील सदस्यांना वेळोवेळी होणाऱ्या \सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले जाते.
द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय स्तरावर परस्परसंवादाद्वारे लोकशाहीचा जगभर प्रसार करण्यासोबतच लोकशाहीच्या मुल्यांना आणि प्रक्रियांना बळकटी देण्यासाठी एकमेकांशी संपर्क रहावा या उद्देशाने तसेच ज्ञानाची आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात.
S.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1876727)
आगंतुक पटल : 304