युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 ची घोषणा


राष्ट्रपती 30 नोव्हेंबर 2022 रोजी पुरस्कार प्रदान करणार

Posted On: 14 NOV 2022 8:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 नोव्‍हेंबर 2022 

ठळक वैशिष्ट्ये:

  • मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 शरथ कमल अचंता यांना जाहीर
  •  क्रीडा आणि क्रीडास्पर्धा  2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार  

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 ची घोषणा केली. 30 नोव्हेंबर 2022 (बुधवार) रोजी संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात   राष्ट्रपतींकडून   पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

(i)Major Dhyan Chand Khel Ratna Award 2022

 

S. No.

Name of the sportsperson

Discipline

1.

Shri Sharath Kamal Achanta

Table Tennis

 

(ii)Arjuna Awards for outstanding performance in Sports and Games 2022

 

S. No.

Name of the sportsperson

Discipline

1.

Ms Seema Punia

Athletics

2.

Shri Eldhose Paul

Athletics

3.

Shri Avinash Mukund Sable

Athletics

4.

Shri Lakshya Sen

Badminton

5.

Shri Prannoy HS

Badminton

6.

Shri Amit

Boxing

7.

Ms Nikhat Zareen

Boxing

8.

Ms Bhakti Pradip Kulkarni

Chess

9.

Shri R Praggnanandhaa

Chess

10.

Ms Deep Grace Ekka

Hockey

11.

Ms Shushila Devi

Judo

12.

Ms Sakshi Kumari

Kabaddi

13.

Ms Nayan Moni Saikia

Lawn Bowl

14.

Shri Sagar Kailas Ovhalkar

Mallakhamb

15.

Ms ElavenilValarivan

Shooting

16.

Shri Omprakash Mitharval

Shooting

17.

Ms Sreeja Akula

Table Tennis

18.

Shri Vikas Thakur

Weightlifting

19.

Ms Anshu

Wrestling

20.

Ms Sarita

Wrestling

21.

Shri Parveen

Wushu

22.

Ms Manasi Girishchandra Joshi

Para Badminton

23.

Shri Tarun Dhillon

Para Badminton

24.

Shri Swapnil Sanjay Patil

Para Swimming

25.

Ms Jerlin Anika J

Deaf Badminton

 

(iii)Dronacharya Award for outstanding coaches in Sports and Games 2022

 

A. Regular Category:

 

S. No.

Name of the Coach (S/Shri/Ms)

Discipline

1.

Shri Jiwanjot Singh Teja

Archery

2.

Shri Mohammad Ali Qamar

Boxing

3.

Ms Suma Siddharth Shirur

Para Shooting

4.

Shri Sujeet Maan

Wrestling

 

B. Lifetime Category:

 

S.No.

Name of the Coach (S/Shri/Ms)

Discipline

1.

Shri Dinesh Jawahar Lad

Cricket

2.

Shri Bimal Prafulla Ghosh

Football

3.

Shri Raj Singh

Wrestling

 

(iv)Dhyan Chand Award for Lifetime achievement in Sports and Games 2022

 

S. No.

Name of the sportsperson

Discipline

1.

Ms Ashwini Akkunji C.

Athletics

2.

Shri Dharamvir Singh

Hockey

3.

Shri B.C Suresh

Kabaddi

4.

Shri Nir Bahadur Gurung

Para Athletics

 

(v) Rashtriya Khel Protsahan Puruskar 2022

 

S. No.

Category

Entity recommended for RashtriyaKhel Protsahan Puruskar, 2022

1.

Identification and Nurturing of Budding and Young Talent

TransStadia Enterprises Private Limited

 

2.

Encouragement to sports through Corporate Social Responsibility

Kalinga Institute of Industrial Technology

3.

Sports for Development

 

Ladakh Ski & Snowboard Association

 

(vi) मौलाना अबुल कलाम आझाद (एमएकेए ) चषक 2022:

गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव  आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी उल्लेखनीय खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात.

मागील चार वर्षांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूने क्रीडा क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ दिला जातो.

मागील चार वर्षांच्या कालावधीतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शविल्याबद्दल.‘क्रीडा  आणि क्रीडा स्पर्धांमधील  उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार’ दिला जातो.

सातत्यपूर्ण आधारावर उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कार्य केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रशिक्षित करून सक्षम केल्याबद्दल ‘क्रीडा आणि क्रीडा स्पर्धांमधील  उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार’ प्रशिक्षकांना दिला जातो

ज्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने क्रीडा क्षेत्रात  योगदान दिले आहे आणि निवृत्तीनंतरही क्रीडा स्पर्धांच्या प्रचारात सातत्याने योगदान देणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी ‘क्रीडा  आणि क्रीडा स्पर्धांमधील  कामगिरीसाठी ध्यानचंद जीवनगौरव  पुरस्कार’ दिला जातो.

ज्यांनी क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय  भूमिका बजावली आहे, अशा कॉर्पोरेट संस्था (खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही), क्रीडा नियंत्रण मंडळे, स्वयंसेवी संस्था, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संस्थांना  'राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार'दिला जातो.

आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये एकूण सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (एमएकेए)चषक दिला जातो.

यावर्षी, प्रथमच या पुरस्कारांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आणि  समर्पित पोर्टलद्वारे स्वयं -अर्ज करण्याची परवानगी खेळाडू/प्रशिक्षक/संस्था यांना देण्यात आली.यावर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात नामांकने प्राप्त झाली . सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील आणि प्रख्यात खेळाडू,  क्रीडा पत्रकारितेचा अनुभव असलेल्या व्यक्ती आणि क्रीडा प्रशासक यांचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या .निवड समितीने या नामांकन अर्जांवर विचार केला.

संबंधित दुवे: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने क्रीडा पुरस्कार, 2022 साठी आवेदने मागवली


* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875971) Visitor Counter : 1364