माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी पीआयबीच्या इलेक्ट्रिक कारच्या ताफ्याला झेंडा दाखवून केले रवाना
पेट्रोल/ डिझेल कारच्या जागी इलेक्ट्रिक कारचा वापर केल्यामुळे उत्सर्जनाच्या तीव्रतेत कपात करण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करण्यास मदत होईल
Posted On:
14 NOV 2022 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2022
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी आज पत्र सूचना कार्यालयाच्या इलेक्ट्रिक कारच्या ताफ्याला झेंडा दाखवून रवाना केले.
यावेळी बोलताना एल. मुरुगन यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनापासून प्रेरणा घेऊन भारत सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा उपयोग नेहमीच्या प्रवासाच्या गरजांसाठी करण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारला आहे.
इलेक्ट्रिक कारच्या मागणीत आणखी वाढ करण्यासाठी भारत सरकारच्या सर्व विभागांमध्ये 2023 पर्यंत त्यांच्या वापरासाठी असलेल्या वाहनांच्या संख्येच्या किमान एक तृतीयांश वाहने इलेक्ट्रिक वाहने असतील असे लक्ष्य भारत सरकारने निर्धारित केले आहे, अशी माहिती मुरुगन यांनी दिली. या लक्ष्याच्या पलीकडे जात आपल्या वाहनांच्या ताफ्यामधील 14 वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट केल्याबद्दल मुरुगन यांनी पत्र सूचना कार्यालयाची प्रशंसा केली.
* * *
R.Aghor/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1875959)
Visitor Counter : 127