पर्यटन मंत्रालय

पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (पीएटीए) आणि भारत यांच्यातील सहयोगाबाबत चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये डब्ल्यूटीएम 2022 दरम्यान पीएटीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिझ ऑर्टिगुएरा यांची पर्यटन सचिवांनी घेतली भेट

Posted On: 10 NOV 2022 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2022

 

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव  अरविंद सिंह आणि अतिरिक्त सचिव राकेश कुमार वर्मा यांनी पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (पीएटीए) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिझ ऑर्टिगुएरा यांची भेट घेतली. पीएटीए आणि भारत यांच्यातील सहयोग, पुढील वर्षी वार्षिक परिषद भारतात आयोजित होण्यासंबंधीची शक्यता, पीएटीए वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट आणि जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या कार्यक्रमांमधील सहभाग यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. लंडनमध्ये 7 ते 9 नोव्हेंबर या काळात आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट डब्ल्यूटीएम (WTM) 2022 मध्ये भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय सहभागी झाले. 

भारतीय शिष्टमंडळात विविध राज्यांचे पर्यटन मंत्री, पर्यटन मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय प्रवास आणि पर्यटन विभागाच्या  भागीदारांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. डब्ल्यूटीएम (WTM) 2022 मधील भारताच्या सहभागादरम्यान, जागतिक पर्यटन उद्योगाशी संबंधित, सहल संचालक, सहल एजंट, माध्यमे यासारख्या भागधारकांसमोर, भारताद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पर्यटन विषयक सुविधा प्रदर्शित केल्या जात आहेत. 

भारतीय शिष्टमंडळाने कॉन्फेडरेशन ऑफ बिझनेस इंडस्ट्री (सीबीआय) चे आंतरराष्ट्रीय संचालक अँडी बर्वेल यांचीही भेट घेतली आणि भारतीय पर्यटन क्षेत्रात व्यवसाय/गुंतवणुकीच्या संधींची शक्यता आणि भारत हे गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण कसे आहे यावर चर्चा केली.

डिसेंबर 2022 ते  नोव्हेंबर 2023 या काळात भारत आगामी जी-20 परिषदेचे अध्यक्षपद  भारताच्या पर्यटन क्षेत्राला, देशाच्या पर्यटन क्षेत्राद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा अधोरेखित करायला आणि पर्यटन क्षेत्राच्या यशोगाथा जागतिक व्यासपीठावर सामायिक करायला सहाय्य करेल. 

भारतीय शिष्टमंडळाने यूके इंडिया बिझनेस कौन्सिल (युकेआयबीसी) चे व्यवस्थापकीय संचालक केविन मॅककोल यांचीही भेट घेतली आणि त्यांना आगामी पर्यटन गुंतवणूकदार परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. 

सचिव  अरविंद सिंह यांनी, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राष्ट्रकुल देशांमधील सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि गुंतवणूक परिषद (आयटीआयसी) च्या चर्चासत्रात भाग घेतला.

संबंधित बातम्‍या :

 

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875013) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu