भारतीय निवडणूक आयोग

वायू प्रदूषणाशी संबंधित शेतातील कचरा जाळण्याच्या घटनांमध्ये ऑक्‍टोबर 2021 च्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये राजस्थानमध्ये 160% आणि पंजाबमध्ये 20% वाढ झाली असून त्याबाबत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले सावध

Posted On: 06 NOV 2022 6:08PM by PIB Mumbai

 

दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग पाचव्या दिवशी ‘अतिशय वाईट ' श्रेणीत राहिल्यामुळे प्राथमिक शाळा सक्तीने बंद ठेवायला लागल्या आहेत,याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत,केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञानपृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी सावध केले आहे की वायू प्रदूषणाशी संबंधित शेतातील कचरा जाळण्याच्या घटनांमध्ये राजस्थानमध्ये 160% आणि पंजाबमध्ये 20% वाढ झाली आहे. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ असा होतो की दोन्ही राज्यांतील सरकार अशा प्रकारचा कचरा जाळणे थांबविण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाहीत आणि त्यामुळे दिल्ली एनसीआरमधील हवेची गुणवत्ता सतत ढासळत आहे.

भू- विज्ञान मंत्रालयाच्या  भारतीय हवामान विभागाचेही डॉ जितेंद्र सिंह प्रभारी आहेत, ते यासंदर्भात म्हणाले की, दुसरीकडे, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत अशा प्रकारच्या  घटनांमध्ये लक्षणीय  घट नोंदविण्यात आली  आहे.

2018-19 पासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, केंद्र सरकारने 3,138 कोटी रुपये राज्यांना शेतातील कचरा व्यवस्थापनासाठी दिले आहेत, त्यापैकी जवळपास 1,500 कोटी रुपये केवळ पंजाबला देण्यात आले आहेत,असे डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले.

दिल्लीत या वर्षी ऑक्टोबरमध्ये "अतिशय खराब" हवेची गुणवत्ता सतत 7 दिवस नोंदवली गेली आहे, याउलट  ऑक्टोबर 2021 मध्ये असे एकही प्रकरण आढळले नाही, असा इशाराही त्यांनी  दिला.

***

S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1874130) Visitor Counter : 190