महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह 2022 अंतर्गत, 31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन
"भ्रष्टाचार मुक्त भारत - विकसित भारत" आणि "भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित राष्ट्रासाठी" या मुख्य संकल्पनावर केले कार्यक्रम .
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केली ई-कार्यालयाच्या 100% वापराची अंमलबजावणी
मंत्रालयाकडून जीईएम – जेम पोर्टलद्वारेच सर्व खरेदी
निबंध लेखन आणि भित्तीपत्रक बनवण्याच्या स्पर्धांचे आयोजन
Posted On:
06 NOV 2022 11:37AM by PIB Mumbai
महिला आणि बाल विकास मंत्रालय भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्रियतेने काम करण्यात आघाडीवर आहे. प्रतिबंधात्मक दक्षतेचा पायंडा रुजवण्याच्या दिशेने आणि सर्व नोंदी तसेच सर्व कामांच्या पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ई-कार्यालयाच्या 100% वापराची अंमलबजावणी मंत्रालयाने केली आहे. तसेच, मंत्रालयातर्फे सर्व खरेदी जेम (जीईएम) पोर्टलद्वारेच केली जाते.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दक्षता जनजागृती सप्ताह 2022 अंतर्गत निबंध लेखन आणि भित्तीपत्रक निर्मिती स्पर्धांचे केले आयोजन.
पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा याबाबत सरकारी अधिकार्यांना सजग करण्यासाठी, 31.10.2022 ते 06.11.2022 या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह 2022 अंतर्गत "भ्रष्टाचार मुक्त भारत - विकसित भारत" आणि "भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित राष्ट्रासाठी" या संकल्पनेवर आधारित उपक्रम मंत्रालयाने आयोजित केले. मंत्रालयाने आठवड्याभरात खालील कामे केली:-
1. मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी
31.10.2022 रोजी घेतलेल्या प्रामाणिकपणाच्या ऑनलाइन प्रतिज्ञेने सप्ताहाची सुरुवात झाली.
2.मंत्रालयाच्या आवारात शास्त्रीभवन तसेच जीवनविहार आणि जीवन तारा इमारतीत विविध ठिकाणी फलक लावण्यात आले.
3.केन्द्रीय दक्षता आयोगाने जारी केलेल्या सूचना, मंत्रालयाशी संबंधित सर्व संस्थांना पाठवण्यात आल्या. आठवडाभरात विविध क्षेत्रीय आणि जागृती कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती त्यांना त्यात करण्यात आली.
4.कार्यालयात ( नियमांनुसार) काय करावे आणि करू नये यासंबंधीचे परिपत्रक मंत्रालयाच्या सर्व विभागांमध्ये प्रसारित केले गेले.
5.निबंध लेखन आणि भित्तीपत्रक निर्मिती स्पर्धा
02.11.2022 रोजी आयोजित करण्यात आल्या.
*****
Suvarna B/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1874081)