पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील बैतूल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
अपघातग्रस्तांना प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधीतून सानु्ग्रह अनुदान जाहीर
प्रविष्टि तिथि:
04 NOV 2022 10:01AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, दि. 4 नोव्हेंबर, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील बैतुल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अपघातग्रस्तांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधी (पीएमएनआरएफ) मधून सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
पंतप्रधानांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की;
‘मध्य प्रदेशातील बैतुल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दु:ख वाटले. अपघातामध्ये ज्यांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्याविषयी माझ्या मनात सहवेदना आहेत. अपघातामधील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी इच्छा. अपघातग्रस्तांना प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधी (पीएमएनआरएफ) मधून सानुग्रह अनुदान जाहीर करतो. या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाइकाला दोन लाख रूपये तर जखमींना उपचारासाठी 50,000 रूपये अनुदान देण्यात येईल : पंतप्रधान’’
****
Shailesh P/Suvarna/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1873638)
आगंतुक पटल : 233
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam