गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) ही राष्ट्रीय शहरी वाहतूक परिषद आणि एक्स्पो 2022, कोची इथे 4 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार .

Posted On: 03 NOV 2022 11:27AM by PIB Mumbai

केरळमध्ये कोची इथे 4 नोव्हेंबर 2022 रोजी, 15 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) या राष्ट्रीय शहरी वाहतूक परिषदेचं आणि एक्स्पो 2022 चं  उद्घाटन, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, हरदीप सिंग पुरी आणि केरळचे मुख्यमंत्री,  पिनारई विजयन संयुक्तपणे करतील. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, केरळ सरकारच्या सहकार्यानं, कोची इथल्या हॉटेल ग्रँड हयात मध्ये  4 ते 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.  या कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारचे धोरणकर्ते वरिष्ठ अधिकारी, मेट्रो रेल्वे कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, वाहतूक उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आंतरराष्ट्रीय तज्ञ, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

परिषदेला उपस्थित राहणाऱ्या त्या त्या शहरांमधील अधिकाऱ्यांना आणि तज्ञांना, जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या सध्याच्या नवीन आणि सर्वोत्तम शहरी वाहतूक व्यवस्थांची माहिती जाणून घेता यावी आणि या माहितीचा प्रचार-प्रसार त्यांनी आपापल्या शहरांमध्ये करावा, हे या परिषदेचं प्राथमिक उद्दीष्ट आहे. या परिषदेमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा इतर  व्यावसायिकांशी, तसच तंत्रज्ञान आणि सेवा पुरवठादारांशी संवाद साधण्याची संधीही उपस्थितांना मिळणार आहे. त्यामुळे उपस्थित प्रतिनिधी त्यांच्या शहरात शाश्वत पद्धतीनं शहरी वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी, या परिषदेतून मिळालेल्या संकल्पना राबवू शकतील. या कार्यक्रमामुळे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ, तंत्रज्ञान तसच सेवा पुरवठादार , धोरणकर्ते, अभ्यासक आणि शहरी वाहतूक क्षेत्रातील अधिकाऱ्यांना आपापल्या संकल्पना, विचार यांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्यासाठी  एकत्र असं एक व्यासपीठ उपलब्ध होतं.

यावर्षी, अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद आणि एक्स्पो 22, "आझादी@75 - शाश्वत आत्मनिर्भर नागरी वाहतूक" या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणार आहे.  शहरांमध्ये, कार्यक्षम, उच्च दर्जाची आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था तयार करुन  तिची अंमलबजावणी कशी करता येईल यावर, यात भर दिला जाणार आहे.  माहिती तंत्रज्ञानात  वेगानं होणारी  प्रगती आणि वाहतूक क्षेत्रातील नवकल्पनांमुळे, सर्वांच्या वाहतूक विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त योग्य वापर करणं शक्य होत आहे.

 UMI परिषद आणि एक्स्पो 2022 चा तपशीलवार दिवसवार कार्यक्रम

***

Shailesh P/Ashutosh/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873432) Visitor Counter : 497