पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाची इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक तेल कंपन्यांना इथेनॉल खरेदीसाठीच्या यंत्रणेला मंजुरी- इथेनॉल पुरवठा वर्ष 2022-23 च्या पुरवठ्यासाठी इथेनॉलच्या दरात सुधारणा

Posted On: 02 NOV 2022 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने  या इथेनॉल पुरवठा वर्ष, ईएसवाय 2022-23 दरम्यान, एक डिसेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या आगामी 2022-23 च्या साखर हंगामासाठी विविध ऊस आधारित कच्च्या मालापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या उच्च दराला मंजुरी दिली आहे  :

  1. सी हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 46.66 रुपयांवरून प्रतिलीटर 49.41 रुपये वाढ करण्यात आली आहे,
  2. बी हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 59.08 रुपयांवरून प्रतिलीटर 60.73 रुपये वाढ करण्यात आली आहे,
  3. ऊसाचा रस/ साखर/ काकवी यांच्यापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 63.45 रुपयांवरून प्रतिलीटर 65.61 रुपये वाढ करण्यात आली आहे.

त्याव्यतिरिक्त जीएसटी आणि वाहतूक आकार देय असेल.

सर्व डिस्टिलरींना या योजनेचा लाभ मिळवता येईल आणि त्यांच्यापैकी बऱ्याच कंपन्यांकडून ईबीपी, इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी इथेनॉलचा पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे. इथेनॉल उत्पादकांना त्यांची भरपाई पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे इथेनॉल पुरवठादारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर पैसे देता येतील ज्यामुळे शेतकऱ्यांच्या  समस्या कमी होण्यासाठी मदत होईल.

सरकार  इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी)  कार्यक्रम राबवत आहे तर तेल विपणन कंपन्या 10% पर्यंत इथेनॉल मिसळून पेट्रोलची विक्री करत आहेत. या कार्यक्रमाचा 1 एप्रिल 2019 पासून अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप वगळता संपूर्ण भारतभर  विस्तार करण्यात  आला आहे. पर्यायी आणि पर्यावरण स्नेही इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा यामागचा उद्देश आहे. या निर्णयामुळे आयातीमध्ये कपात होईल आणि  कृषी क्षेत्राला चालना मिळेल.

सरकारने इथेनॉलच्या उत्पादनासाठी साखर आणि साखर आधारित कच्च्या मालाच्या इतरत्र वापरासह शेतकऱ्यांच्या थकबाकीत कपात करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. ऊसाच्या रसाचे आणि बी हेवी मोलासिसचे इथेनॉलमध्ये रुपांतर केल्यामुळे आता साखर हंगामाच्या सुरुवातीपासूनच इथेनॉल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने 1 नोव्हेंबर ते त्यापुढील वर्षातील 31 ऑक्टोबरपर्यंतचे वर्ष इथेनॉल पुरवठा वर्ष म्हणून मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय  साखरेची एफआरपी आणि कारखान्यातील साखरेचा दर यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असल्याने ऊस आधारित कच्च्या मालापासून मिळालेल्या इथेनॉलच्या कारखान्यातील दरामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1873131) Visitor Counter : 286