गृह मंत्रालय
केंद्रीय गृह मंत्रालयाने केले विशेष मोहीम 2.0 चे यशस्वी आयोजन
Posted On:
01 NOV 2022 2:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2022
केंद्रीय गृहमंत्रालयाने 2 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विशेष मोहीम 2.0 यशस्वीरीत्या राबवली. विशेष स्वच्छता मोहीम 2.0 अंतर्गत 11,559 स्थळे निवडण्यात आली होती. ज्यामध्ये सार्वजनिक प्रणालीच्या अखत्यारीतील क्षेत्रीय आणि ‘आउटस्टेशन’ कार्यालयांचा समावेश आहे. या अंतर्गत खासदार कार्यालय , संसदीय कामकाज , आंतर-मंत्रिस्तरीय सल्लामसलत , राज्य सरकार , पंतप्रधान कार्यालय , सार्वजनिक तक्रारी आणि सार्वजनिक तक्रारी अपील यांसारख्या विविध श्रेणींमधील प्रलंबित प्रकरणांचा कार्यक्षमतेने निपटारा करण्यात आला.
विशेष मोहीम 2.0 दरम्यान मंत्रालय आणि त्याच्या संलग्न / अधीनस्थ कार्यालयांमध्ये पुनरावलोकनासाठी एकूण 5.15 लाख फायली निर्देशित करण्यात आल्या. यापैकी 4.77 लाख फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले असून 2.81 लाख फायली निकाली काढण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत भंगार सामानाच्या विल्हेवाटीतून आलेले उत्पन्न 1,40,99,510 रुपये इतके असून 90,525 चौरस फूट जागाही मोकळी करण्यात आली आहे.
विशेष मोहीम 2.0 च्या पूर्वतयारीच्या टप्प्यात एकूण 5,126 सार्वजनिक तक्रारी आणि याचिका निवारणासाठी अधोरेखित करण्यात आल्या होत्या , त्यापैकी 4,708 सार्वजनिक तक्रारी आणि याचिकांचे प्रभावीपणे निवारण करण्यात आले आहे.
यासंदर्भात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), दिल्ली पोलीस आणि संलग्न/अधिनस्थ कार्यालयांद्वारे 2,000 हून अधिक ट्विट पोस्ट केले गेले आहेत, त्यापैकी 200 हून अधिक ट्विट , मंत्रालयाच्या PIB ट्विटर हँडल @PIBHomeAffairs वरून री-ट्विट करण्यात आले आहेत.
Some of the photographs related to Special Campaign 2.0

Before & After Images of Badminton court, North Block

Before & After Images of Main Office, NKSTPP, Tandwa

Before & After Images of Corridors at North Block

Before & After Images of office room at NCB, Jammu

Outdoor Cleanliness activities at Laitkor, Shillong

Outdoor Cleanliness activities at Changlang, Arunachal Pradesh

Swachhata activities near Tower Morcha HQR/153 Bn

Swachhata activities near Jhelum River Area 53 Bn
S.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1872645)