नौवहन मंत्रालय

‘एससीडीपीएम 2.0 मोहिमेअंतर्गत पीपीपी शी संबंधित मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी ‘पीपीपी तक्रार निवारण मंचा’चे आयोजन:सर्व महत्वाच्या बंदरांशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

Posted On: 31 OCT 2022 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2022

 

प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठीची विशेष मोहीम एससीडीपीएम 2.0 चा भाग म्हणून, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने पीपीपी म्हणजे- सरकारी खाजगी भागीदारीशी संबंधित हितसंबंधियांची कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश, या विषयाशी संबंधित सर्व प्रलंबित तक्रारींचे निवारण करणे हा होता. जास्तीत जास्त तक्रारींचे निवारण ताबडतोब केले जावे, यासह उर्वरित तक्रारींचे निवारण निश्चित कालावधीत करण्यासाठी यावेळी प्रयत्न करण्यात आले.

पारादीप बंदर प्राधिकरणाने देखील पीपीपी तक्रार निवारण मंच आयोजित केला होता. यात विविध हितसंबंधीय, ज्यात, कन्सेशनेर आणि कॅप्टिव बर्थ ऑपरेटर्स म्हणजे ज्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत, असे हितधारक सहभागी झाले होते. सर्व सहभागी लोकांनी मांडलेल्या तक्रारी आणि मुद्दे बंदर व्यवस्थापनाने लक्षपूर्वक ऐकले आणि त्यापैकी बहुतांश मुद्यांचे लगेचच निराकरणही करण्यात आले.

त्याचप्रमाणे, कांडला इथल्या दीनदयाल बंदर प्राधिकरणाने पीपीपी तक्रार निवारण मंच संबंधी कार्यशाळा आयोजित केली होती. यात, शेतकरी खते सहकारी लिमिटेड, तसेच कांडला आंतरराष्ट्रीय कंटेनर लिमिटेड तसेच अदानी बंदर आणि विशेष आर्थिक क्षेत्र लिमिटेडचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण-जेएनपीएने देखील मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित पीपीपी तक्रार निवारण बैठकीचे आयोजन, सर्व टर्मिनल ऑपरेटर्ससाठी केले होते.

न्यू मंगळूरु बंदर प्राधिकरणाने (NMPA) विशेष मोहीम 2.0 चा भाग म्हणून विद्यमान पीपीपी आणि कॅप्टिव्ह टर्मिनल/बर्थच्या भागधारकांसह ‘पीपीपी तक्रार निवारण मंच’ वर एक मिश्र (ऑनलाईन-ऑफलाइन) कार्यशाळा आयोजित केली. या बैठकीला सर्व विभागप्रमुख, एनएमपीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या तक्रार निवारण कार्यशाळेत सर्व भागधारक/कन्सेशनर्स  उपस्थित होते. यावेळी  विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

याच मोहिमेचा भाग म्हणून सर्व बंदर प्राधिकरणांनी ‘सर्वोत्तम पद्धतींची’ अंमलबजावणी केली. यात कार्यालय परिसरात आणि आजूबाजूला स्वच्छता उपक्रम, जनजागृती कार्यशाळा, फाइल्स आणि रेकॉर्डचे डिजिटलीकरण, रोपे लावणे, ई-कार्सची अंमलबजावणी इत्यादींचा समावेश होता. त्याशिवाय, विविध नियम आणि नियमने सुलभ करण्यावरही भर देण्यात आला.


* * *

S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872282) Visitor Counter : 123